google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राज्याला नवे गृहमंत्री मिळणार..? वळसे पाटीलांवर शिवसेना नाराज..? ' या ' नेत्याचे नाव आघाडीवर.

Breaking News

राज्याला नवे गृहमंत्री मिळणार..? वळसे पाटीलांवर शिवसेना नाराज..? ' या ' नेत्याचे नाव आघाडीवर.

 राज्याला नवे गृहमंत्री मिळणार..? वळसे पाटीलांवर शिवसेना नाराज..?  ' या ' नेत्याचे नाव आघाडीवर. 

राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता असून राज्याच्या गृहमंत्री पदावरून दिलीप वळसे पाटील यांना हटवले जाणार असल्याची चर्चा आहे.


गृहखाते हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहणार असून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हातात गृहखात्याचा कारभार दिला जाण्याची शक्यता आहे. १ मे पूर्वी हा बदल होऊ शकतो. याबाबतचे एका वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे


राज्यातील महाविकास आघाडी सरकार मधील नेत्यांवर ईडी कारवाई होत असताना गृहखात्या कडून म्हणावा तसा पलटवार भाजप नेत्यांवर केला जात नसल्याची तक्रार यापूर्वी देखील सरकारमधील नेत्यांकडून केली जात होती. तेव्हापासूनच गृहमंत्री पद दुसऱ्या कोणाला तरी देण्याबाबत चर्चा रंगल्या होत्या. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील यापूर्वीच गृहखात्याबाबत उघड नाराजी व्यक्त करत म्हंटल होत कि, गृहखात्याने दमदार पाऊले टाकली पाहिजेत, अस्ते कदम भूमिका घ्याल तर स्वतःभोवती तुम्ही फाशीचा दोर आवळत आहात असा इशारा त्यांनी दिला होता.


दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनीही एका कार्यक्रमात बोलताना म्हंटल होत की , वळसे पाटील साहेब, गृहखात्याचा हिसका दाखवा आणि भाजपच्या २-४ नेत्यांना तुरुंगात टाका, आधीच हे काम केलं असत तर आज परिस्थिती आली नसती असे म्हणत त्यांनी वळसे पाटलांचे कान टोचले होते. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता गृहमंत्री बदलाच्या चर्चा पुन्हा एकदा रंगल्या आहेत.

Post a Comment

0 Comments