रेल्वेने ‘हा’ महत्वाचा नियम बदलला; प्रवाशांचा होणार मोठा फायदा..!
कोरोनाचा कहर आता कमी झाला असून, भारतातील जनजीवन पूर्वपदावर येतंय.. कोरोना काळात पूर्णपणे बंद करण्यात आलेल्या बससेवा, रेल्वेसेवा आता पूर्वीप्रमाणेच सुरु झाल्या आहेत. कोविडबाबतचे निर्बंध पूर्णपणे हटवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांची अनेक नियमांतून सूटका झाली आहे..
दरम्यान, कोरोना संसर्ग कमी झाल्याने रेल्वेची सेवा पूर्वीच्याच क्षमतेने सुरु झालीय.. मात्र, भारतीय रेल्वेने कोरोना काळात केलेले नियम अजूनही सुरु होते. त्यामुळे रेल्वेने प्रवास करताना, नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही बाब लक्षात आल्यावर भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे..
रेल्वेचा मोठा निर्णय..
कोरोना संकटाने देश व्यापलेला असताना, काही प्रमाणात रेल्वे सुरु होती. त्यावेळी रेल्वेचे तिकीट बूक करताना ‘आयआरसीटीसी’ ची वेबसाइट, तसेच अॅपवर ‘डेस्टिनेशन’ पत्ता भरावा लागत होता. त्याशिवाय रेल्वेचे तिकीट काढता येत नव्हतं.
रेल्वेच्या ‘डेस्टिनेशन अॅड्रेस’च्या नियमामुळे कोविडच्या पॉझिटिव्ह केसेस शोधण्यात मोठी मदत झाली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता रेल्वेची सेवा पूर्वीप्रमाणे सुरू झाली, तरी कोरोना काळातील अनेक तरतुदी तशाच लागू होत्या. सध्याच्या काळात या नियमांची गरज नव्हती. त्याचा प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता..
दरम्यान, ही बाब लक्षात आल्यावर रेल्वे मंत्रालयाने ‘डेस्टिनेशन’च्या नियमात बदल केलाय. तसा आदेश नुकताच रेल्वे मंत्रालयाने जारी केला. त्यानुसार आता प्रवाशांना यापुढे रेल्वेचे तिकीट काढताना, जिथं जायचं आहे, त्या ठिकाणाचा पत्ता वेबसाईटवर किंवा अॅपवर भरण्याची गरज नाही..
भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंगबाबत नुकताच हा निर्णय घेतला. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ही सेवाही पुन्हा सुरु..
कोरोना काळातच रेल्वेने प्रवाशांना उशी-ब्लॅंकेट देण्याचे बंद केले होते. मात्र, अलीकडेच रेल्वेने हा नियमही बदलला असून, आता पुन्हा एकदा डब्यात प्रवाशांना उशी-ब्लँकेट देण्यास सुरुवात केली आहे. आता विविध गाड्यांमधील प्रवाशांना रात्री झोपण्यासाठी उशा आणि ब्लँकेट दिले जात असल्याचे सांगण्यात आले..
0 Comments