google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापुरात "अजय देवगण नंतर सनी देओल" नावाच दरोडेखोर ; सहा घरफोड्या नंतर सापडला पोलिसांच्या तावडीत सापडला

Breaking News

सोलापुरात "अजय देवगण नंतर सनी देओल" नावाच दरोडेखोर ; सहा घरफोड्या नंतर सापडला पोलिसांच्या तावडीत सापडला

 सोलापुरात "अजय देवगण नंतर सनी देओल" नावाच दरोडेखोर ;

सहा घरफोड्या नंतर सापडला पोलिसांच्या तावडीत

सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी केली आहे. अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ येथील दरोड्यासह हन्नुर, चपळगाव, पानमंगरुळ, तडवळ तसेच मोहोळ तालुक्यातील सौंदणे येथील घरफोडी आशा सात गुन्ह्यांची उकल करून 18 लाख 76 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखे ने ही कारवाई केली आहे. अन्य पाच आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.


अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ येथे सहा दरोडेखोरांनी घरात प्रवेश करून शांताबाई दत्तात्रय कोळेकर यांच्यासह त्यांच्या पतीला मारहाण करून 3 लाख 16 हजाराचा मुद्देमाल दरोडा टाकून चोरून नेला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असता गुप्त बातमीदाराच्या आधारे मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सापळा रचून सनीदेवल सुरेश काळे (25) या आरोपीस ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपींनी सात गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.


अक्कलकोट तालुक्यातील तालुक्यातील 6 गुन्हे आणि मोहोळ तालुक्यातील एक असे एकूण सात गुन्हे उघड करण्यात आलेत. यामध्ये एकूण 39 तोळे सोन्याच्या दागिन्यासह 80 ग्राम चांदीचे दागिने असा एकूण 18 लाख 76 हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच यातील अन्य पाच आरोपींचा तपास सुरू असून लवकरच सर्व आरोपींना पकडण्यात लवकरच यश येईल अशी माहिती पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी यावेळी दिली.

Post a Comment

0 Comments