google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहरात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करावे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र कांबळे यांची मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

Breaking News

सांगोला शहरात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करावे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र कांबळे यांची मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

 सांगोला शहरात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करावे

 काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र कांबळे यांची मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी


सांगोला( प्रतिनिधी)- स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होण्याचा मान पंडित जवाहरलाल नेहरू यांना मिळाला देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या वडिलांनी आपल्या संपत्तीचा आणि विदेशी वस्तूंचा त्याग केला


 व स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करून स्वातंत्र्य चळवळीला प्रोत्साहन दिले त्यांचे महान कार्य व प्रेरणा सामान्य लोकांना मिळावी यासाठी सांगोला शहरांमध्ये त्यांचे स्मारक पुतळा उभारण्यात आला परंतु कालांतराने या स्मारकाची दुरावस्था झालेली आहे याची दखल घेऊन सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रविंद्र कांबळे यांनी लेखी निवेदनाद्वारे नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांना विनंती केली की या पुतळ्याचे सुशोभीकरण करावे,


 रंगकाम ,कंपाउंड चे दुरुस्ती रंगकाम ,पाण्याचे कारंजे बनविणे आधुनिक पद्धतीचे लेझर लाईट, उच्चप्रतीचे रंगीत बल्ब यासह इतर सुशोभिकरणाचे काम त्वरित करावे व सांगोला शहरात शोभेल असे सुशोभीकरण करावे या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार आपण करून कामास सुरुवात करावी म्हणून विनंती अर्ज देण्यात आला


   "आपण दिलेल्या अर्जाचा विचार करून लवकरात लवकर कामास सुरुवात करून चांगल्या पद्धतीचे सुशोभीकरण करणार असल्याचे  नगर परिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी आश्वासन दिल्याचे  काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र कांबळे यांनी सांगितले आहे"

Post a Comment

0 Comments