google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राजू शेट्टी स्वतः मोदींच्या पीएम किसान योजनेचे लाभार्थी ; म्हणाले मुळातच ही योजनाच बोगस

Breaking News

राजू शेट्टी स्वतः मोदींच्या पीएम किसान योजनेचे लाभार्थी ; म्हणाले मुळातच ही योजनाच बोगस

 राजू शेट्टी स्वतः मोदींच्या पीएम किसान योजनेचे लाभार्थी ; म्हणाले मुळातच ही योजनाच बोगस

सोलापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी हे सोमवारी सोलापूर दौऱ्यावर आहेत दरम्यान दुपारी शासकीय विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेस ज्येष्ठ नेते सिद्रामप्पा अब्दुलपुरकर, जिल्हाध्यक्ष अमोल हिप्पर्गी, तानाजी बागल, विजय रणदिवे, इक्बाल मुजावर, रायप्पा हळणवर, रणजित बागल, उमाशंकर पाटील, पप्पू पाटील यांची उपस्थिती होती.



 यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या मालाला आधारभूत किंमत मिळायला पाहिजे, सध्या 23 पिकांना आधारभूत किंमत जाहीर झाली आहे पण ऊस वगळता इतर पिकांना आधारभूत किंमत मिळत नाही तसेच फळे व भाजीपाला आणि दूध यांनाही जादा दर व दूध किंमत मिळावी अशी आपली मागणी आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यात देशभरातील ग्रामपंचायतीमध्ये असे ठराव करून राष्ट्रपतींची भेट घेणार आहे शेतीमालाला आधारभूत किंमत मिळावी याबाबत मी आग्रह करणार आहे असे राजू शेट्टी यांनी सांगितले.


राज्यभरात पी एम किसान योजनेच्या त्रुटीबाबत विचारले असता त्यांनी, मुळात मोदींची ही योजनाच बोगस असल्याचे टीका केली. कारण मी माजी लोकप्रतिनिधी आणि या योजनेस पात्र नसतानाही माझ्या खात्यावर दर चार महिन्याला दोन हजार रुपये पडतात याप्रकरणी तहसीलदारांना खात्यावरील रक्कम परत करण्याचा प्रयत्न केला तरीही रक्कम माझ्या खात्यावर येते म्हणून ही योजना बोगस असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.


ऊस दर नियंत्रण समिती महाविकास आघाडीने दुबळी केली आहे, कधी काळी शेतकरी संघटनेचे नेते होते मात्र मात्र कारखान्याच्या संचालक काम समोर त्यांची बोलण्याची हिंमत नाही अशी माणसं ऊस नियंत्रण समितीमध्ये घेण्यात आली आहेत. इथेनॉल मधून कारखान्याला किती उत्पन्न मिळाले,त्यांच्या 75 टक्के शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे हे ठरवण्याचा अधिकार ऊसदर नियंत्रण समितीला आहे पण हीच समिती दुबळी असेल तर शेतकऱ्यांना न्याय मिळणार कसा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Post a Comment

0 Comments