कौटुंबिक वादातून महिला कॉन्स्टेबलने पोलीस लाईनमध्ये घेतला गळफास…..!
कोल्हापूर : पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबल योगिनी सुकुमार पवार पोलीस लाईन कसबा बावडा यांनी कौटुंबिक वादातून गळफास लावून आत्महत्या केली. कसबा बावडा येथील पोलीस लाईनमध्ये आज दुपारी ही घटना घडली.
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, शहर पोलीस उप अधीक्षक मंगेश चव्हाण, शाहुपूरीचे राजेश गवळी यांनी लगेच घटनास्थळाची पाहणी केली. आत्महत्या करण्यापूर्वी योगिनी पोवार यांनी लिहिलेली चिट्ठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पतीकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे त्यात म्हटले आहे. याप्रकरणी शाहूपूरी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.
0 Comments