google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वाटंबरेच्या सरपंचपदी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे मा.किरण पवार यांची बिनविरोध निवड

Breaking News

वाटंबरेच्या सरपंचपदी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे मा.किरण पवार यांची बिनविरोध निवड

 वाटंबरेच्या सरपंचपदी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे  मा.किरण पवार यांची बिनविरोध निवड 

सांगोला : तालुका प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील कायमच बहुचर्चित व आदर्शवत असलेल्या वाटंबरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते व मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांचे विश्वासू किरण आबासाहेब पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.


 सर्वत्रिक पंचवार्षिक निवडणुक 2020 ही वाटंबरे गावातील सर्व प्रमुख पक्षातील नेते व गावातील तरुण  यांच्या प्रयत्नातून ही निवडणूक बिनविरोध पार पडली होती.त्यामध्ये सुरुवातीचे एक वर्ष शिवसेनेचे युवक कार्यकर्ते मा. प्रवीण पवार यांची सरपंचपदी नियुक्ती झाली होती, पण त्यांना देण्यात आलेल्या कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आणि त्या रिक्त असलेल्या सरपंच पदाच्या जागी सर्वानुमते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे किरण पवार यांची सरपंचपदी निवड करण्यात आली.


यासाठी वाटंबरे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच निवड प्रक्रिया पार पडली, यामध्ये या निवडणूक प्रक्रियेमध्ये किरण पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकारी मंडळ अधिकारी श्री.सरवदे व ग्रामविकास अधिकारी श्री.मोहिते यांनी राष्ट्रवादीचे किरण पवार यांची बिनविरोध निवड झाली असे जाहीर केले. या निवडीनंतर गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते व युवक वर्गाने मोठ्या दिमाखात रयतेचे


 राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून व ग्रामदैवत श्री खंडेराया यांचे दर्शन घेऊन उत्सव साजरा केला .याप्रसंगी सर्व ग्रामपंचायत सदस्य ,ज्येष्ठ नेते महादेव पवार, सुब्राव पवार, विजय पवार, मधुकर पवार ,राजाराम पवार ,मोहन पवार, बबन पवार ,नामदेव गेजगे ,बिरा गेजगे ,बंडू पवार, सुभाष पवार, रामहरी पवार ,नानाबापू पवार, पोपट पवार, उमेश गायकवाड, 


प्रल्हाद पवार ,उदय गायकवाड, आप्पासाहेब गव्हाणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष लहू पवार, गणपत पवार ,राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष श्रीधर पवार, यांच्यासह गावातील विविध संस्थांचे चेअरमन ,व्हॉइस चेअरमन, तरुण कार्यकर्ते, महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी माजी तंटामुक्त अध्यक्ष मधुकर पवार व श्री. विजयदादा पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.   


 गावातील सर्व नेतेमंडळी नागरिकांनी तसेच मतदार बंधू भगिनींनी आपल्यावर विश्वास ठेवून आपणास काम करण्याची संधी दिली. आमचे नेते मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी आपल्याला पक्षाचे काम करण्याची संधी दिली. यापुढे आबांच्या मार्गदर्शनाखाली गावाचा सर्वांगीण विकास करण्यास आपण कटिबद्ध राहू . दिपकआबांच्या माध्यमातून गावाला जास्तीत जास्त विकास निधी आणण्याचा प्रयत्न करू व गावाचा कायापालट करण्याचा प्रयत्न करू ;


किरण पवार ; नूतन सरपंच, वाटंबरे.

Post a Comment

0 Comments