google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 गुणरत्न सदावर्तेविरोधात मराठा मोर्चा आक्रमक !

Breaking News

गुणरत्न सदावर्तेविरोधात मराठा मोर्चा आक्रमक !

 गुणरत्न सदावर्तेविरोधात मराठा मोर्चा आक्रमक !

 सातारा : शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्याच्या कटकारस्थानाच्या प्रकरणी आरोपी असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात मराठा मोर्चाने आज सातारा पोलीस   ठाण्याच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी केली.


राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचारी संप प्रकरणात चर्चेत आलेले वकील गुणरत्न सदावर्ते हे शरद पवार यांच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी झालेल्या हल्ला प्रकरणी अधिकच चर्चेत आले आणि पोलिसांनी त्यांना कट रचल्याच्या आरोपात अटक केली आहे. चार दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली तोच आज सातारा पोलिसांनी त्यांचा ताबा घेतला आणि सातारा येथे घेऊन आले. सातारा येथे सदावर्ते विरोधात दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या प्रकरणी त्यांना सातारा येथे आणण्यात आले असून आज अटकेची कारवाई आणि उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 


सदावर्ते यांना साताऱ्यात आणल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाने पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली आणि सदावर्ते विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संतप्त मराठा क्रांती मोर्चाच्या या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला आणि काही काळ वातावरण तणावपूर्ण झाल्याचे दिसले. सदावर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले तसेच छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी वक्तव्य केले होते. याप्रकरणी दीड वर्षांपूर्वी सातारा पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यानी 'धिक्कार असो, धिक्कार असो, सदावर्तेचा धिक्कार असो' 'एक मराठा, लाख मराठा' अशा जोरदार घोषणा 


पदाधिकारी ताब्यात !

मराठा क्रांती मोर्चाने अत्यंत आक्रमकपणे घोषणा देत सदवार्तेचा धिक्कार केला. पोलीस ठाण्याच्या बाहेरच ही घोषणाबाजी झाल्याने वातावरण तणावपूर्ण होऊ लागताच पोलिसांनी या पदाधिकाऱ्याना ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही 'अशा प्रवृत्ती ठेचल्या पाहिजेत' अशा प्रकारे मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी म्हणत होते.  


सदावर्तेचे बेताल वक्तव्य 

एका वाहिनीवर बोलताना सदावर्ते यांनी दोन्ही छत्रपतींच्या संदर्भात बेताल वक्तव्य केले होते त्यामुळे मराठा समाज संतप्त आहे. पाटण तालुक्यातील तारळे येथील राजेंद्र निकम यांनी या बेताल वक्तव्याबद्धल सातारा पोलिसात तक्रार दिली होती त्यानुसार सदावर्ते विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  

Post a Comment

0 Comments