महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप! आता या दोन पक्षांची युती होणार?
आताच्या घडीला भाजप देशाचं सर्वात मोठं नुकसान करत आहे. त्यामुळे भाजपचा पराभव करण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते आम्ही करू असाही जलील यावेळी बोलताना म्हणाले.
औरंगाबाद – देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकांमध्ये चार राज्यांतील सत्ता कायम राखण्यात भाजपला यश मिळालं. तेव्हापासून देशासह राज्याच्या राजकारणात देखील मोठ्या घडामोडी होताना दिसत आहेत. भाजपला चारही राज्यांच्या निवडुकांमध्ये मिळालेलं यश बघता ही महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडी सरकारसाठी धोक्याची घंटा आहे असं म्हणता येईल.
दरम्यान, राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. शिवाय कोणता पक्ष कधी कोणाला पाठिंबा देईल हे सांगताच येत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात देखील एक अशीच राजकीय भूकंप आणणारी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी आणि एमआयएमच्या दोन मोठ्या नेत्यांमध्ये महाराष्ट्रात युतीच्या मुद्यावर चर्चा झाली आहे. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील आणि महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तसेच राष्ट्रवादी नेते राजेश टोपे यांच्यात ही भेट झाली आहे.
एका खाजगी वृत्तवाहिनीलाजलील यांनी मुलाखत दिली, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. दोन दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माझ्या घरी येऊन एक बैठक घेतली. या बैठकीदरम्यान राजकीय चर्चा सुद्धा झाली. जर प्रत्येकवेळी आम्हाला भाजपची बी टीम म्हणतात, तर मग राष्ट्रवादीसोबत आम्ही युती तयार करायला आहोत अशी ऑफर आम्ही त्यांना दिली. असं इम्तियाज जलील यांनी सांगितलं. त्यामुळे आता या ऑफरवर राष्ट्रवादी पक्षातर्फे काय उत्तर येतं ते पाहू आणि मग आवश्यक ती पावले उचलू असं जलील म्हणाले.
मुळात एमआयएमला सोबत घेणे हे कोणत्याच पक्षाला नको आहे, मात्र मुस्लिमांची मतं सर्वांना हवीत. त्यामुळे जर काँग्रेसला वाटत असेल तर त्यांनीही यावे आम्ही त्यांच्यासोबत सुद्धा युती करण्यास तयार आहोत. आताच्या घडीला भाजप देशाचं सर्वात मोठं नुकसान करत आहे. त्यामुळे भाजपचा पराभव करण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते आम्ही करू असाही जलील यावेळी बोलताना म्हणाले.
0 Comments