सांगोला भूमी अभिलेख कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी यांच्या आशीर्वादाने खाजगी एजंट व शासकीय कर्मचारी यांनी वयोवृद्ध नागरिकाला घातला गंडा
आरपीआय नेते सुरजदादा बनसोडे व इतर नागरिकांच्या सतर्कतेमुळे वयोवृद्ध नागरिकाला मिळाले पैसे परत
सांगोला प्रतिनिधी : प्रमुख अधिकाऱ्यांच्या संगनमताने भूमी अभिलेख कार्यालयातील खाजगी व शासकीय कर्मचारी यांच्याकडून सर्वसामान्य गोरगरीब जनतेची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. यासंदर्भात नुकताच घडलेला प्रकार म्हणजेच खाजगी व शासकीय कर्मचारी यांनी जमीन मोजणी करण्यासाठी घेतलेले पैसे परत देता का नाही
यासंदर्भात वयोवृद्ध नागरिक हातामध्ये काठी घेऊन भूमी अभिलेख कार्यालय मध्ये गेल्या असता हा प्रकार समोर आला. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते तथा आरपीआयचे जिल्हा सरचिटणीस सुरजदादा बनसोडे यांनी सदरचे प्रकरण लावून धरल्यानंतर संबंधित खाजगी एजंट व शासकीय कर्मचारी यांनी वयोवृद्ध नागरिकाचे घेतलेले पैसे परत केले.
सांगोला तालुक्यातील नुकत्याच पार पडलेल्या आमसभेत माजी नगरसेवक सुरजदादा बनसोडे यांनी सर्वच शासकीय कार्यालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप केला होता. यामध्ये संबंधित वरिष्ठ अधिकारी देखील सहभागी असल्याचे खाजगी एजंट व शासकीय कर्मचारी यांच्याकडून सांगण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामध्ये एखतपुर येथील वयोवृद्ध नागरिक आपली जमीन मोजून मिळावी म्हणून मागील सहा महिन्यापासून भूमी अभिलेख कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. परंतु भूमी अभिलेख कार्यालयातील प्रमुख अधिकारी यांच्याकडून सदरचे काम केले जात नसल्याने, सदर वयोवृद्ध नागरिकांनी आमच्याकडून पुन्हा पावती अथवा पैसे घ्यावेत परंतु आमची जमिनीची मोजणी करून घ्यावी अशी मागणी केली. यावर खाजगी एजंट व शासकीय कर्मचारी यांनी 13 हजार रुपयाची मागणी केली.
यावर हेलपाटे मारून त्रस्त झालेल्या वयोवृद्ध नागरिकांनी हातउसने पैसे काढून सदर एजंट व कर्मचारी यांच्या मागण्या पूर्ण केल्या. परंतु तरी देखील जमिनीची मोजणी केली जात नसल्याने संतप्त वयोवृद्ध नागरिक यांनी सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हातामध्ये काठी घेऊन खाजगी एजंट व शासकीय कर्मचारी यांचा भर चौकात खुलेआम समाचार घेतला. दरम्यान प्रमुख अधिकारी यांनी याबाबत कोणतीही दखल घेण्याचा प्रयत्न देखील केला नाही.
एवढेच नव्हे तर एजंट व शासकीय कर्मचारी यांनी शासकीय कामात अडथळा केला म्हणून सदर वयोवृद्ध नागरिकांवर गुन्हा दाखल करतो अशी वयोवृद्ध नागरिकांना दमदाटी करीत धमकी दिली. यावेळी आरपीआयचे जिल्हा सरचिटणीस सुरजदादा बनसोडे यांनी सदर खाजगी एजंट व शासकीय कर्मचारी यांना माहिती विचारली दरम्यान वयोवृद्ध नागरिक यांच्याकडून त्यांनी पैसे घेतल्याचे कबूल केले.
यावर संतप्त जमाव खाजगी एजंट व कर्मचाऱ्यांना दगाफटका करणार तोपर्यंत सुरजदादा बनसोडे यांनी वयोवृद्ध नागरिकांचे दिलेले पैसे परत देण्याचे सांगितले. यावर एजंट व अधिकारी यांनी यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार हे प्रकरण केल्याचे सांगितले. तरीही तुम्ही पैसे घेतले आहेत तुम्ही यांचे पैसे परत करा अशा सूचना दिल्यानंतर शासकीय कर्मचारी व खाजगी एजंट यांनी वयोवृद्ध नागरिकांचे पैसे परत केले.
सांगोला तालुक्यातील बहुतांशी कार्यालयात असा भ्रष्टाचाराचा प्रकार राजरोसपणे सुरु आहे. प्रत्येक कार्यालयात विशेष दलालांमार्फत कामकाज सुरू आहे. सर्वसामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरीदेखील या संदर्भात कोणीही बोलण्यास तयार नाही, ही मोठी शोकांतिका असून संबंधित खात्याचे प्रमुख यांच्यावर लोकप्रतिनिधी यांचा कोणताही धाक राहिला नाही हे निश्चित आहे. यामुळे लोकप्रतिनिधीची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप सुरजदादा बनसोडे यांनी केला आहे.



0 Comments