संजय गांधी निराधार पेन्शन योजना ,रमाई घरकुल व पंतप्रधान घरकुल योजनेचे अनुदान वाढवून मिळावे
-काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र कांबळे यांची आम सभेत मागणी.
सांगोला (प्रतिनिधी) - सांगोला तालुक्याची आमसभा आमदार ॲड शहाजीबापू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सांगोला शहरातील अहिल्यादेवी होळकर सभागृहामध्ये पार पडली .यावेळी संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, अपंगासाठी ची पेन्शन योजना यासह रमाई घरकुल आवास योजना तसेच पंतप्रधान घरकुल आवास योजना या योजनांचे अनुदान वाढवून मिळावे
याबाबतचा ठराव आमसभेने घ्यावा अशा पद्धतीची मागणी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र कांबळे यांनी केले आपल्या मनोगतामध्ये ते म्हणाले की शासनाच्या वतीने निराधार लोकांसाठी सुरू असलेल्या संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय वृद्धापकाळ
योजना यासह अपंगासाठी असलेली निराधार योजनेचे अनुदान हे महागाईच्या काळामध्ये हे अनुदान कमी असल्यामुळे वरील पेन्शन योजनांचे अनुदान दुप्पट करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
शासनाकडून घरकुल योजना जाहीर करण्यात आलेले आहेत वाढती महागाई लक्षात घेता त्यामध्ये घरकुल बांधकामासाठी लागणारे साहित्य या गोष्टींची वाढलेली रक्कम लक्षात घेता सामान्य कुटुंबांना घरकुल योजना पूर्ण करणे शक्य होत नसल्यामुळे शासनाची रमाई घरकुल आवास योजना तसेच पंतप्रधान आवास योजना व इतर घरकुल योजना या योजनांचा निधी वाढवून दिल्यास सामान्य नागरिकांना याचा फायदा होणार आहे तरी वरील योजनांचे अनुदान वाढवून मिळावे याबाबतची मागणी
सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र कांबळे यांनी आम सभेमध्ये मागणी केली. अशा पद्धतीचा ठराव आजच्या आमसभेने घ्यावा अशा पद्धतीची मागणी केल्याने या मागणीचे सर्व नागरिकाकडून स्वागत केले जात आहे शासनाने याची दखल घेऊन वरील योजनांचे अनुदान वाढवल्यास याचा सामान्य नागरिकांना फायदा होणार आहे.



0 Comments