सांगोला तालुका पंचायत समितीची आमसभा आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सभागृह येथे
आमदार अॅड . शहाजीबापू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली .
सांगोल्यातील अधिकारी शिरजोर बनलेत, शहाजीबापू तुम्ही अॅक्शन कधी घेताय? धान्य वेळेत मिळत नाही, शासकीय कार्यालयात वाटमारी होत आहे. महावितरण कार्यालय तर वसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा गळा घोटत आहे. शहाजीबापू तुम्ही आमदार म्हणून अॅक्शन कधी घेताय? असा सवाल आमसभेत उपस्थित करण्यात आला. माजी नगरसेवक सूरज बनसोडे यांनी तर भर सभेत अधिकारी हे चोर बनले असल्याचा घणाघात करत अधिकाऱ्यांची एक एक पिसे उपसून काढली.
सांगोला तालुक्यातील बहुतांशी विभागातील अधिकारी प्रचंड निष्क्रिय आणि शिरजोर बनलेत. जणू चोरांचेच राज्य आहे. सर्वसामान्यांची एकही कामे नीट होत नाहीत. धान्य वेळेत मिळत नाही, शासकीय कार्यालयात वाटमारी होत आहे. महावितरण कार्यालय तर वसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा गळा घोटत आहे. शहाजीबापू तुम्ही आमदार म्हणून अॅक्शन कधी घेताय? असा सवाल आमसभेत उपस्थित करण्यात आला. माजी नगरसेवक सूरज बनसोडे यांनी तर भर सभेत अधिकारी हे चोर बनले असल्याचा घणाघात करत अधिकाऱ्यांची एक एक पिसे उपसून काढली. ही सभा प्रचंड गदारोळात पार पडली.
तब्बल तीन वर्षांनंतर झालेली सांगोला तालुक्याची आमसभा प्रचंड वादळी ठरली. या सभेत तालुकावाशियांचा रोष पाहायला मिळाला. गेली पाच ते सहा वर्षांपासून तसेच 2012 च्या चारा छावण्यांची थकीत बिले काढण्यासाठी उद्याच सर्वांची तात्काळ बैठक लावून, लवकरात लवकर त्यांना न्याय दिला जाईल ,असे ॲड. आम शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
सांगोला पंचायत समितीची आमसभा आम.शहाजीबापू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहात 29 मार्च रोजी रोजी पार पडली. यावेळी माजी आम.दीपकआबा साळुंखे – पाटील,चंद्रकांत देशमुख,पुरोगामी युवक संघटनेचे राज्यअध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख,युवक नेते सागर पाटील,भाजपचे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख,ॲड.सचिन देशमुख,सूरज बनसोडे,संगमअप्पा धांडोरे,दादासाहेब बाबर, भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार,राणीताई कोळवले,जयमाला गायकवाड, शहाजी नलवडे,तानाजी पाटील,बाळासाहेब काटकर,खंडू सातपुते, कमारुद्दिन खतीब यांच्यासह अन्य मान्यवर मंडळी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होती.
पंचायत राज कमिटीच्या शिफारशीवरून जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आमसभा ही भरविली जाते. त्याच अनुषंगाने कोरोनाच्या प्रादुर्भावा नंतर प्रथमच ही सभा घेण्यात आली. आमसभेच्या सुरुवातीलाच विविध प्रश्नाने ही चांगली गाजली. उपस्थित अनेक पदाधिकाऱ्यांनी चारा छावण्याचा विषय लावून धरला.
यावेळी उपस्थित जनतेला मार्गदर्शन करताना आम.पाटील म्हणाले की, आता दंड वगैरे सर्व झाले, त्यांची बिले तात्काळ अदा करावीत.त्यासाठीच उद्याच प्रांत, तहसीलदार यांच्यासमवेत बैठक लावून,लवकर बिले काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यातील विजेच्या ,पंतप्रधान किसान योजनेच्या,घरकुलाच्या,विविध पेन्शन योजनेच्या कोणाच्याही तक्रारी असल्या तरी माझ्याशी संपर्क साधावा.
तालुक्यातील 26 हजार लोकांना रेशनचा माल मिळत नाही. पीएम किसान योजनेचे 15 हजाराहून अधिक शेतकरी वंचित आहेत.तसेच तहसील विभागातील संबंधित क्लार्क ही यांच योजनेच्या कामासाठी वारेमाप पैसे घेवूनही कामे करीत नाही. पीक विम्याचे तीन मंडल कायम वगळले जातात,त्यामुळे अनेक शेतकरी वंचित राहत आहेत.त्यासाठी गावोगावी आमदार आणि खासदार निधीतून पर्जन्यमापक यंत्रे बसवावित,असाही ठराव यावेळी करण्यात आला.
प्रारंभी शोकसभा
अमासभेच्या प्रारंभी सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते भाई स्व.गणपतराव देशमुख, गरीबाची माय सिंधूताई संकपाळ, गानकोकिळा लता मंगेशकर यांना आदरांजली वाहण्यात आली.
विभागांचा आढावा
यावेळीतहसील, कृषी, पोलिस स्टेशन,शिक्षण, बांधकाम,पाणीपुरवठा, आरोग्य,लघु पाटबंधारे,वनीकरण, सामाजिक वनीकरण, अंगणवाडी,रोहयो, आदीसह अन्य विभागाचा आडवा घेण्यात आला.
जनतेच्या मनात एक प्रकारचा रोषच पहावयास मिळत होता.यामध्ये तहसील,महावितरण,कृषी विभागाच्या असंख्य तक्रारी पहावयास मिळाल्या. यावेळी माजी आम.दीपकआबा साळुंखे – पाटील, डॉ.बाबासाहेब देशमुख,श्रीकांत देशमुख,सचिन देशमुख,बाबुराव गायकवाड,सुभाष इंगोले,बाळासाहेब काटकर,चेतनसिंह केदार,खंडू सातपुते यांनी आपले विचार व्यक्त केले.


0 Comments