google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर : थकबाकी नसल्याने बुद्धेहाळ तलाव सिंचन सुरळीत बुद्धेेहाळ तलाव

Breaking News

सोलापूर : थकबाकी नसल्याने बुद्धेहाळ तलाव सिंचन सुरळीत बुद्धेेहाळ तलाव

 सोलापूर : थकबाकी नसल्याने बुद्धेहाळ तलाव सिंचन सुरळीत बुद्धेेहाळ तलाव

सोलापूर/सांगोला :  थकबाकीचा आकडा फुगत चालला असताना बुद्धेेहाळ तलाव लाभक्षेत्रात कुठलीही थकबाकी नाही. शेतकरी एकत्रित येऊन पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून पाणी मागणी व आवर्तन निश्‍चिती करतात. चोख व्यवहारामुळे इथले शेतकरी प्रशासनाच्या विश्‍वासास पात्र ठरले आहेत, अशी माहिती श्रमिक मुक्‍ती दल पाणी संघर्ष चळवळीचे गणेश बाबर यानी दिली .


गेली आठ-नऊ वर्षे टेंभू योजनेतून बुद्धेहाळ तलावात पाणी घेण्यात येत आहे. याकाळात तीसहून अधिक आवर्तनाचा लाभ या क्षेत्रातील शेतीला झाला आहे. डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली श्रमिक मुक्‍ती दल पाणी संघर्ष चळवळीच्या वतीने यासाठी मोठा संघर्ष करण्यात आला. लाभक्षेत्रातील शेतकरी या पाण्याचे महत्त्व ओळखून आहेत. पैसे भरून पाणी घेण्याची इथली परंपरा वाखाणण्याजोगी आहे.


गेल्या आठवड्यात 19 मार्चला झालेल्या संस्थांच्या बैठकीत सविस्तर चर्चा होऊन 25 मार्चपासून उन्हाळी आवर्तन चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रत्येक संस्थेची अंतिम मागणी सादर करण्यासाठी 25 मार्च रोजी बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये संस्थांकडून आलेली एकूण मागणी अपेक्षेपेक्षा कमी होती. त्यामुळे वहनतूट वाढून पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आवर्तन पुढे ढकलण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. पुढील बैठक 3 एप्रिलला होणार असून त्यामध्ये संस्थांनी सुधारित मागणी सादर करण्याचे ठरले.


संबंधित बातम्या

किरीट सोमय्या

सिंचन व्यवस्थेचे शेतकर्‍याकडून व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत बुद्धेहाळ तलाव लाभक्षेत्रातील सर्व 16 संस्थांची निर्मिती झाली आहे. ही संपूर्ण निवडणूक बिनविरोध होऊन नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आले आहे. लोकशाही तत्वांना अनुसरून, पारदर्शीपणे या संस्थांचा कारभार चालू आहे. सोबतच शिखर संस्थेची निर्मितीसुद्धा प्रगतीपथावर आहे. बुध्देहाळ तलावाच्या पाणी नियोजनातील लोकसहभागामुळे लाभक्षेत्रातील गावांमध्ये एकोपा निर्माण झाला आहे. यासाठी कराव्या लागलेल्या संघर्षाची जाण शेतकर्‍यांना आहे. चर्चेतून आणि परस्परविश्‍वासाने कुठल्याही अडचणीतून मार्ग काढू शकतो, हा विश्‍वास शेतकर्‍यांमध्ये आहे. संपूर्ण राज्यामध्ये आदर्शवत ठरावे, अशा पद्धतीने या संस्थांची वाटचाल आहे.


राजकीय फायद्यासाठी हस्तक्षेप वाढला

बुद्धेहाळ तलाव पाण्यावरून काही राजकीय नेते यामध्ये राजकारण घुसडण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकशाही प्रक्रियेतून निर्माण झालेल्या या संपूर्ण पाणी व्यवस्थेचा अवमान करण्याचा हा प्रकार आहे. इथले शेतकरी जबाबदार आणि जागरूक आहेत. नेतेमंडळींनी राजकीय फायद्यासाठी हस्तक्षेपाचा प्रयत्न केल्यास जनतेच्या रोषास सामोरे जावे लागेल हे मात्र नक्की.

Post a Comment

0 Comments