सोलापूर -सांगोला आमसभेत युवा नेतृत्व- “डाँ बाबासाहेब देशमुख यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीत
-” जनता सेवक अधिकारी यांची काढली खरडपट्टी”
आमसभेत तहसीलदार यांच्यासह अनेक अधिकारी गैरहजर..
काल २९ मार्च रोजी सोलापूर येथील सांगोला तालुका पंचायत समितीची आमसभा आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सभागृह येथे आमदार अॅड. शहाजीबापू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी सांगोला तालुक्यातील जनता समस्या आणि कार्य याविषयी सर्व विभागाचे अधिकारी,कार्यकर्ते, याच्या विचारांची देवाणघेवाण ,समस्या आम जनतेसमोर मांडल्या जातात यावेळी तालुक्याचे आमदार अॅड. शहाजीबापू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम ,गटविकास अधिकारी आनंद लोकरे आणि टीम ,कायदा सुव्यवस्था तहसीलदार अभिजित पाटील,पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी इत्यादी सहकार्यातून “साकार आम जनतेची सभा” पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सभागृह येथे सम्पन्न झाली.
यावेळी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष -डाँ बाबासाहेब देशमुख यांनी आमसभेमध्ये आनेक विषय मांडुन अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले सदर आमसभेमध्ये पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डाँ बाबासाहेेब देशमुख यांनी विविध प्रश्न उपस्थित केले..यावर सम्बनधित अधिकारी यांचा या प्रश्नांवरती अधिकारी वर्गालाही योग्य प्रकारे उत्तरे देता आली नाहीत त्यावेळेस अधिकारी यांची भांबेरी उडाली*
डाँ बाबासाहेब देशमुख यांनी सांगोले तालुक्यातील तीन मंडलाचा पिक विम्यामध्ये समावेश न झालेबद्दल नाराजी व्यक्त केली.सध्या प्रत्येक मंडलामध्ये पाऊसाचे प्रमाण मोजण्यासाठी जी पर्जन्यमापन यंत्रे बसवली आहेत त्या पर्जन्य यंत्राबाबतच शंका उपस्थित करण्यात आली कितीतरी वर्षापुर्वीची ही पर्जन्य यंत्रे आहेत ते योग्यप्रकारे काम करतात का ? व ती यंत्रे योग्य प्रकारे काम करीत नसतील तर आजपर्यंत शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याला कोण जबाबदार असा खरमरीत सवाल डाँ बाबासाहेब देशमुख यांनी उपस्थित केला
तसेच एका मंडलामध्ये कीमान १० ते १५ गावे असतात एका गावात पाऊस पडला तर दुसर्या गावात पडतोच आसे नाही मग एका पर्जन्यापन ईतर गावच्या पाऊसाचे प्रमाण कसे धरायचे त्यासाठी परजन्यमापन यंत्रांची संख्या वाढवावी असेही डाँ बाबासाहेब देशमुख यांनी सांगीतले….
तसेच विजेच्या बाबतीतही अनेक प्रश्न उपस्थित केले २४ तास विजेच्या वापरापैकी १६ तास वापरलेल्या विजेला शासन अनुदान देते व राहीलेल्या ८ तासाचे विज बिल शेतकर्यांने भरावे आसाच शासनाचा नियम आहे मग जर शेतकऱ्यांना लाईटच ८ तास मिळत असेल तर शेतकरी यांनी कशाचे विजबील भरायचे व शासनाच्या १६ तासाच्या अनुदानाचे काय ?असा ताळेबंद केला तर शेतकऱ्यांचेच देणे शासन लाग आहे.शासनाने शेतकरी यांची जास्तीचे पैसे भरुन घेतलेले परत करण्याची मागणी डाँ बाबासाहेब देशमुख यांनी यावेळी केली.
म्हैशाळ योजनेच्या कामाबाबतही डाँ बाबासाहेब देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केले दिवंगत आबासाहेबांनी अथक परीश्रमाने टेंभु म्हैशाळ योजनेचे पाणी सांगोले तालुक्याला मिळावे यासाठी आतोनात प्रयत्न केले मात्र अंतिम टप्प्यामध्ये पाईप लाईनची कामे आली असताना काही ठिकाणी पाईप लाईनच्या गळतीमुळे शेतकर्यांच्या शेतामध्ये पाणी येण्यास अडचण निर्माण झाली आहे.एक तर वर्षातुन एकदाच हे पाणि येत आहे आशातच पाईपलाईन जर लिकेज आसतील तर त्या दुरुस्त केंव्हा करणार ? तसेच दुरुस्त केलेनंतर त्याची टेस्टिंग केंव्हा घेणार?कारण पाणी एकवेळ येणार मग शेतकरी त्यांच्या शेतात पाणि केंव्हा व कसे येणार असा संतप्त सवाल डाँ बाबासाहेब देशमुख यांनी उपस्थित केला
अशा प्रकारे पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डाँ बाबासाहेब देशमुख यांनी अभ्यासपूर्ण मांडणी करून आमसभा गाजवली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार ऍड. शहाजीबापू यांनी जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल ते विविध मंजूर कामाचा आढावा सादर केला आणि विविध अधिकारी यांनी झालेला कामाविषयी माहिती सांगितली.आणि आमसभेला तहसीलदार पासून गैरहजर अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याचा ठराव घेण्यात आला.
यावेळी माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील, शेकापचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत देशमुख, राष्ट्रवादीचे नेते बाबुराव गायकवाड, शिवसेना नेते भाऊसाहेब गायकवाड, पुरोगामी संघटनेचे बाबासाहेब देशमुख, श्रीकांतदादा देशमुख, युवा नेते सागरदादा पाटील, शहाजीदाजी नलवडे, सुभाषभाऊ इंगवले, दत्ता सावंत DS, युवक नेते गुंडादादा खटकाळे, गटविकास अधिकारी आनंद लोकरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका अध्यक्ष खंडूसातपुते ते तालुका सरचिटणीस-संजय गाडे ,नगरसेवक सूरज बनसोडे,शेतकरी कामगार पक्ष प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत सरतापे.. इत्यादी आदींसह विविध विभागांचे अधिकारी इतर मान्यवर,नागरिक, पत्रकार .. उपस्थित होते


0 Comments