google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 विजय दादांची सांगोल्यात जोरात मोर्चेबांधणी निमित्त स्नेहभोजनाचे; चर्चा नगरपरिषद, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची

Breaking News

विजय दादांची सांगोल्यात जोरात मोर्चेबांधणी निमित्त स्नेहभोजनाचे; चर्चा नगरपरिषद, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची

 विजय दादांची सांगोल्यात जोरात मोर्चेबांधणी 


निमित्त स्नेहभोजनाचे; चर्चा नगरपरिषद, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची


सांगोला (तालुका प्रतिनिधी): भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील नव्या- जुन्या कार्यकर्त्यांचा समन्वय साधून जोरदार मोर्चबांधणी करण्यास सुरुवात केली. 


सांगोला दौऱ्यात विजयदादांनी आपल्या गाडीमध्ये एका बाजूला जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार आणि दुसऱ्या बाजूला पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख यांना बसवून विरोधकांना सूचक मेसेज दिला आहे. कडलास मध्ये स्नेहभोजनाच्या निमित्ताने आनंदा माने गटाचे नगरसेवक, डॉ.बाबासाहेब देशमुख, शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस दादासो बाबर 


सांगोला सहकारी सूतगिरणीचे चेअरमन नानासाहेब लिगाडे, नागणे ताईंचा गट या सर्वांचा मेळ दिसून आला. स्नेहभोजनाचे निमित्त असले तरी आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांसह सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनीती आखण्यात आली असल्याची चर्चा सुरू आहे.


सांगोल्यात 2018 मध्ये पाण्यासाठी शेतकऱ्यांनी जनावरांसहित तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन व आमरण उपोषण सुरू केले होते. आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देण्यासाठी 


माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर सांगोला तालुक्याच्या पाणी चळवळीतील युवा कार्यकर्ते आणि विजयसिंह मोहिते-पाटील यांचा संपर्क मोठ्या प्रमाणात वाढला. सांगोल्याच्या पाणी प्रश्नांबाबत विजयदादांनी आंदोलक व अधिकारी यांच्या समवेत अनेक बैठका घेतल्या.


माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगोला सांगोला तालुक्याचा दौरा करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या- जुन्या कार्यकर्त्यांना एकत्रित आणून रणनीती आखली असल्याची चर्चा सुरू आहे. 


स्नेहभोजनाचे निमित्त असले तरी यावेळी आगामी निवडणुका कशा पद्धतीने लढवाव्यात यावर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे विरोधकांना सूचक मेसेज देण्यासाठी विजयदादांनी आपल्या गाडीमध्ये एका बाजूला जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार आणि दुसऱ्या बाजूला डॉ.बाबासाहेब देशमुख यांना बसवले होते.


यावेळी विजयदादांनी मेंढ्यांची तसेच प्रसिद्ध खिलार गाईंची पाहणी केली. तसेच डॉ.सयाजीराव गायकवाड यांच्या कॉलेज मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार दादांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख, 


प्रा.नानासाहेब लिगाडे , भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार, जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, माजी नगराध्यक्ष राणी माने, जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब बाबर, संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष दीपकदादा वाडदेकर, भाजपच्या प्रांतिक सदस्य राजश्री नागणे, 


माजी नगरसेवक आनंद माने, अस्मिर तांबोळी, प्रशांत धनवजीर, माऊली तेली, शिवाजीराव गायकवाड, सुनील पवार, विजय बाबर,सरपंच दिगंबर भजनावळे, काँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड, पेनुरचे ग्रामपंचायत सदस्य रणजीत चवरे, कुर्डूवाडीचे प्रवीण सोमासे, जिल्हा सचिव आनंद फाटे उपस्थित होते.


विजयदादांच्या सांगोला दौऱ्याचे नियोजन युवक नेते दत्ता टापरे, प्रदीप मिसाळ यांनी पार पाडले. मोहिते पाटील गट व शेतकरी कामगार पक्ष यांचे सुत जुळत असल्याने आगामी निवडणुका रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Post a Comment

0 Comments