सांगोल्यातील ४७ गावांमध्ये मन की बात कार्यक्रमाचे आयोजन
सांगोला (तालुका प्रतिनिधी): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात मधून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन केलं.
भ्रष्टाचार ही देशाला लागलेली कीड आहे असं म्हणत आपण सगळे मिळून प्रयत्न केल्यास ही कीड नष्ट होऊ शकतं, असं ते म्हणाले. भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या मार्गर्शनाखाली सांगोल्यातील ४७ गावांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात मधून देशवासीयांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, 30 जानेवारी हा दिवस आपल्याला बापूंच्या विचारांची शिकवण देतो. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत.
राजपथावर झालेल्या चित्ररथाच्या रॅलीत आपल्या देशाचं शौर्य आणि सामर्थ्य दिसून आलं. देशातील राष्ट्रीय प्रतिकांना पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्याचे प्रयत्न या माध्यमातून सुरु केला आहे.
अमृत महोत्सवाच्या निमित्तानं कित्येक जणांनी पत्र आणि मेसेज पाठवले आहेत. यात काही सूचना देखील आल्या आहेत. काही गोष्टी यावेळी अविस्मरणीय घडल्या आहेत. एक कोटींहून अधिक मुलांनी पोस्टकार्ड लिहून पाठवली असल्याचं त्यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात कार्यक्रम सर्वच बूथवर नेण्याचा निर्णय भाजपने घेतला होता. सांगोला तालक्यातील तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये आक्रमकपणे मोदींचा संदेश पोहोचवण्यासाठी
भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या मार्गर्शनाखाली ४७ गावांमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नमो ॲपच्या माध्यमातून पाच रुपयांपासून एक हजार रुपांपर्यंत मायक्रो डोनेशन देण्याचे आवाहन चेतनसिंह केदार सावंत यांनी केले.

0 Comments