google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पोलीस उपायुक्त वैशाली कडुकर यांचा नवा आदेश ; सोलापुरात हे कराल तर कारवाई करेन

Breaking News

पोलीस उपायुक्त वैशाली कडुकर यांचा नवा आदेश ; सोलापुरात हे कराल तर कारवाई करेन

 पोलीस उपायुक्त वैशाली कडुकर यांचा नवा आदेश ; सोलापुरात हे कराल तर कारवाई करेन



सोलापूर :  मा. उच्च न्यायालय यांनी नायलॉन मांजामुळे दुखापत जिवितहानीच्या घटना घडत असल्याने त्याबाबत यापूर्वी निर्देश जारी केले होते. त्यानंतरही नायलॉन मांजामुळे झालेल्या दुखापतीच्या घटना पुन्हा महाराष्ट्र राज्यात आढळून येत आहेत त्यामुळे मा. न्यायालय यांनी सदरचे प्रकरण पुन्हा Sou Motu PIL क्रं ०१ / २०२१ अन्वये मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठात, दि १४/०१/२०२१ च्या आदेशानुसार दाखल करून घेवून खालीलप्रमाणे निर्देश दिलेले आहेत.



१. सामान्यतः ओळखल्या जाणाऱ्या पक्क्या धाग्यांचा वापर करण्यास परवानगी देण्यात येवू नये. उदा. नायलॉन मांजा, प्लॅस्टिक किंवा अशा कोणत्याही कृत्रिम पदार्थापसून बनवलेला मांजा ज्यामुळे पक्ष्यांना तसेच मानवांना गंभीर दुखापत होवू शकते. विशेषत: मकरसंक्रांत या सणाला पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर केला जातो अशा मांजाच्या वापरावर प्रतिबंध करावा.



२. अशा धाग्यांचे निर्मिती, घाऊक विक्रेते/ किरकोळ विक्रेते/ स्टॉकिउस्ट डिलर्सना अगोदरच थांबवावे. जेणेकरून ते वर्षभर अशा नॉयलॉन मांजा निर्मिती, विक्री, खरेदी आणि साठवणूक करणार नाहीत.



३. पतंग उडवताना वापरण्यात येणारे धागे कापून किंवा पडल्यामुळे माती, पाण्याचे मार्ग आणि गुरांच्या लोकसंख्येवर होणारे प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी जे जैवविघटन करू शकत नाहीत आणि मातीच्या थराला स्पर्श केल्यावर पर्यावरण आणि प्राण्यांना प्रचंड इजा होवू शकतात. ४. जे निसर्गात नॉन- बायोडिग्रेडेबल आहेत आणि पॉवर लाईन्स आणि सबस्टेशनवर फ्लॅश ओव्हरमुळे ग्राहकांना वीज व्यत्यय आणतात, विजेच्या मालमत्तेचे नुकसान करतात, अपघात, जखम आणि जिवितहानी, पर्यावरण हानी होते अशा नायलॉन धाग्याचा वापर टाळावा.




५. सार्वजनिक ठिकाणी तसेच सार्वजनिक वाहतूकीस अडथळा होईल किंवा लोकांच्या जिवितास धोका होईल अशा ठिकाणी पतंग उडवू नये. कोणत्याही ठिकाणी पतंग उडविण्याची स्पर्धा ठरवू नये. वरील आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तिवर भादवि कलम १८८ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ११३ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post a Comment

0 Comments