google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 इंजिनिअर मुलाने आईची हत्या करुन नंतर स्वत:गळफास घेतला..

Breaking News

इंजिनिअर मुलाने आईची हत्या करुन नंतर स्वत:गळफास घेतला..

 इंजिनिअर मुलाने आईची हत्या करुन नंतर स्वत:गळफास घेतला.. 



पुणे दि.०२ डिसेंबर-: इंजिनियर असलेल्या एका मुलाने आपल्या ७६ वर्षाच्या आईला औषधांचा ओव्हर डोस देऊन तिचा चेहरा प्लॅस्टिक पिशवीत घालून हत्या केली. त्यानंतर त्या मुलाने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इंजिनीयर गणेश मनोहर फरताडे आणि त्याची आई निर्मला मनोहर फरताडे अशी या दोघांची नावे आहेत.



याप्रकरणी गणेश याची मावस बहिण शोनित सावंत यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की गणेश फरताडे व आपली आई निर्मला फरताडे हे दोघे धनकवाडीमध्ये रहात होते, गणेश हा इंजिनिअर होता. त्याची नोकरी गेली होती. ५ वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे आजारपणामुळे निधन झाले होते. त्यांच्या आजारपणात खूप पैसा खर्च झाला होता. त्याच्या आईलाही अनेक व्याधी होत्या.त्यावर खूप पैसे खर्च होत होते. आईच्या औषधावर होणारा खर्च व नोकरी नसल्याने त्याला खूप कर्जही झाले होते. या कारणामुळे तो निराश झाला होता. त्यातून त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.



आपल्या मागे आईचे कोण पाहणार, हे लक्षात घेऊन त्याने आईला औषधांचा ओव्हर डोस दिला. ती निपचित पडल्यावर तिच्या चेहर्‍यावर प्लॅस्टिकची पिशवी घालून गळ्यास पांढर्‍या रंगाच्या दोरीने घट्ट बांधून त्यांची हत्या केला. त्यानंतर त्याने शनिवारी पहाटे २ वाजून १० मिनिटांनी एक मेसेज केला. आपण बेरोजगारी आणि कर्ज बाजारी झाल्याने आत्महत्या करीत आहोत, असा मेसेज त्याने आपल्या नातेवाईकांना पाठविला त्यानंतर तो घराच्या छतावर गेला. आणि गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.



त्याच्या नातेवाईकांनी गणेशचा मेसेज सकाळी पाहिला.त्यानंतर त्याची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहकारनगर पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर मावस बहिणीच्या फिर्यादीनंतर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments