धक्कादायक ! पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील महिला पोलीस निरीक्षकाची आत्महत्या
पुणे : पुणे शहर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रभारी आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी आज (शुक्रवारी) राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. त्यानंतर संपुर्ण राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, शिल्पा चव्हाण यांनी कौटुंबिक कारणामुळं आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत असल्याचं पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितलं आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण या अत्यंत ‘डॅशिंग’ आणि ‘कर्तव्यदक्ष’ अधिकारी होत्या. स्वभावाने अतिशय ‘स्ट्रॉग’ असणार्या चव्हाण यांनी आत्महत्या केली यावर त्यांच्या सहकार्यांचा आणि इतर अधिकार्यांचा विश्वासच बसत नाही. सत्य नक्कीच बाहेर येईल अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावर पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचार्यांकडून होत असताना दिसून येत आहेत. सध्याच्या घडीला चव्हाण यांनी कौटुंबिक कारणामुळं आत्महत्या केल्याचं समोर येत असल्याचं पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्पष्ट केलं आहे.
विश्रांतवाडी परिसरातील शांतीनगरमध्ये राहणार्या चव्हाण यांनी राहत्या घरी गळफास घेऊन शुक्रवारी सकाळी आत्महत्या केली. दुपारी साधारण दीड वाजण्याच्या सुमारास चव्हाण यांच्या आत्महत्येची बातमी वार्यासारखी पसरली आणि संपुर्ण राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
सुरूवातीच्या काळात पुणे शहर पोलिस दलाच्या विशेष शाखेत कार्यरत असणार्या चव्हाण गेल्या काही महिन्यांपासुन गुन्हे शाखेत कार्यरत होत्या. सध्या त्यांच्याकडे गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभगाचा पदभार होता. चव्हाण यांनी आत्महत्या केल्यामुळं त्यांच्या मित्रपरिवारावर आणि सहकार्यांवर शोककळा पसरली आहे.
0 Comments