पुसद शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ; पतीने कुऱ्हाडीने केला पत्नीचा खून
पुसद: शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विटाळा वार्डात घरगुती कारणातून उद्भवलेल्या वादात कुऱ्हाडीचा घाव घालून पत्नीचा खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना दि.१७ डिसेंबर २०२१ रोजी शुक्रवारी रात्री८:००ते८:३० वाजल्याच्या घडली. रेखा नारायण खरावे (वय ३५, रा. विटाळा वार्ड) असे मृत महिलेचे नाव आहे. तर नारायण यादवराव खरावे(वय ४०, रा. विटावा वार्ड) असे आरोपी पतीचे नाव आहे.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुसद शहरातील विठाळा वार्ड येथे रहिवासी असलेल्या नारायण यादवराव खरावे वय ४० वर्षे आणि त्यांची पत्नी रेखाबाई नारायणराव खरावे वय ३५ वर्ष यांच्यामध्ये शुक्रवारी रात्री अंदाजे ८:००ते८:३० वाजल्याच्या सुमारास घरगुती किरकोळ कारणावरून घरात वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन पती नारायण यांनी रागाच्या भरात पत्नी रेखा हीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार तिचा खून केला रक्ताच्या थारोळ्यात पत्नी पडली असता तेथून पती नारायण यादव खरावे वय ४० वर्षे हा पसार झाला.
या घटनेची माहिती नंतर नागरिकांना कळताच स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रेखाला पुसद येथील मेडीकेआर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यावरून मृतक महिला शवविचछेदन करण्यासाठी उपजिल्हा शासकीय रुग्णालय पुसद येथे दाखल करण्यात आले असून घटनेचा पुढील तपास शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहे. परंतु सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

0 Comments