google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापुरात वाहतुकीचे नियम मोडल्यास होणार आता जबर दंड; वाहतूक शाखा अ‍ॅक्शन मोडवर

Breaking News

सोलापुरात वाहतुकीचे नियम मोडल्यास होणार आता जबर दंड; वाहतूक शाखा अ‍ॅक्शन मोडवर

 सोलापुरात वाहतुकीचे नियम मोडल्यास होणार आता जबर दंड; वाहतूक शाखा अ‍ॅक्शन मोडवर

सोलापूर शहरात अपघाताचे प्रमाण वाढत आहे. तसेच वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून  वेगवान गाडी चालविण्याची क्रेझ दिसून येत आहे. बेशिस्त वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखा अ‍ॅक्शन मोडवर आली आहे. सोलापूर वाहतूक शाखेने वाहन धारकांसाठी नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. त्याअंतर्गत 3 जानेवारीपासून संपूर्ण शहरात कडक मोहीम राबविण्यात येणार आहे. 



याशिवाय नव्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यास आता मोठा आर्थिक फटका वाहनधारकांना बसणार असून कागदपत्रे अपूर्ण असलेल्या वाहनधारकांना जागेवरच दंड करण्यात येणार आहे. सोलापुरात विना लायसन वाहन चालविल्यास पाच हजार रुपये, ट्रिपलसिट वाहन चालविल्यास एक हजार रुपये दंड आकारून पुढील तीन महिन्यासाठी लाईसन निलंबित होणार आहे. ट्रॅफिक कर्मचार्‍यांच्या इशार्‍याकडे दुर्लक्ष करणे, विना नंबरप्लेट वाहन चालविणे, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना अडथळा होईल असे वाहन पार्क करणे अशा गुन्ह्यांसाठी प्रत्येक 500 रुपये दंड आकारण्यात येईल.



राँग साईडने गाडी चालविल्यास, दारू पिऊन गाडी चालविल्यास तुमच्यावर कोर्टकेस करण्यात येईल. विना इन्शुरन्स वाहन चालविल्यास दोन हजार रुपये, वाहन चालविताना मोबाइलचा वापर केल्यास एक हजार रुपये, दादा, मामा अशा प्रकारचे बेकायदेशीर नंबरप्लेट लावल्यास एक हजार रुपयाचा दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे सोलापूरकरांना गाडी हाकताना संपूर्ण कागदपत्रे जवळ बाळगा अन्यथा तुमच्यावर मोठी कारवाई होऊ शकते.

Post a Comment

0 Comments