बनावट मृत्यूपत्र तयार करुन १ कोटी १० लाखांची फसवणूक सहाजणांविरुध्द गुन्हा दाखल
सोलापूर बनावट मृत्यूपत्र तयार करून सहाजणांनी मिळून पतसंस्थेतील २ कोटी १० लाख ६८ हजार रुपये स्वतःच्या खात्यामध्ये वर्ग करून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे . याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात सहाजणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे . चंद्रशेखर महादेव बागदुरे ( वय ५१ , रा . नरेंद्रनगर , सैफुल ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजशेखर महादेव बागदुरे , राजश्री राजशेखर बागदुरे , राकेश ऊर्फ सिध्देश्वर राजशेखर बागदुरे ( सर्व रा . अक्षय सोसायटी , जुळे सोलापूर ) , शारदा विजयकुमार बागदुरे ( रा . शिवगंगानगर , शेळगी ) , दीपक राजेंद्र माशाळ ( रा . न्यू पाच्छा पेठ , सोलापूर ) , जगदीश सुधाकर जाधव ( रा . मसरे गल्ली ) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे .
रविवार पेठेतील उमासा नागरी सहकारी पतसंस्थेत फिर्यादीच्या वडिलांच्या नावे २ कोटी १० लाख ६८ हजार रुपये जमा होते . आरोपींनी २०१८ पासून आजतागायत दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन फिर्यादीच्या वडिलांचे बनावट मृत्यूपत्र तयार केले . त्या आधारे पतसंस्थेतील रक्कम काढून चंद्रशेखर बागदुरे व त्यांच्या आईची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे . पुढील तपास पोलीस निरीक्षक धायतोंडे हे करीत आहेत .

0 Comments