google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अपंग बाप बनला कसाई पोटच्या गोळ्याचा केला खून

Breaking News

अपंग बाप बनला कसाई पोटच्या गोळ्याचा केला खून

 अपंग बाप बनला कसाई पोटच्या गोळ्याचा केला खून 



पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत हे मुलं माझे नाहीत मी यांना एक दिवस कायमचे संपवून टाकेल त्याला वरती पाठवेल असे म्हणत पत्नीचा नेहमी शारीरिक व मानसिक त्रास देणाऱ्या पतीने आखेर आईच्या कुशीत झोपलेल्या 13 वर्षीय पोटच्या गोळ्याला मध्यरात्री आपल्याजवळ घेऊन त्याचा निर्दयी खून करीत त्याचा मृतदेह कोराडी नदी पात्रात फेकून घटना तालुक्यातील सवडत येथे घडली असून या प्रकरणी पत्नीने पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याने पोलिसांनी त्या निर्दयी पित्यास बेड्या ठोकल्या आहेत अपंग असलेला बापच पोटच्या गोळ्याचा खून करून कसाई बनल्याने समाजमन सुन्न झाले आहे.



याबाबत पोटच्या गोळ्याचा खून करणाऱ्या निर्दयी बापाचे विरोधात पत्नी रत्नमाला हिने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की माझा पती सिद्धेश्वर सखाराम नन्हई वय 40 हा दररोज दारू पिऊन माझ्या चारित्र्यावर संशय घेत मला नेहमी शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायचा मला दोन अपत्य असून 12 वर्षाचा अमर नावाचा मुलगा असून 5 वर्षाची जानवी नावाची मुलगी आहे माझा पति मला दारू पिऊन ही मुले माझ्या पोटची नाहीत त्यामुळे मी त्यांना संपवून टाकील अशी नेहमी धमकी दिली होती.



दिनांक 24 च्या दिवसभर माझा पती सिद्धेश्वर हा साखरखेर्डा येथे गेला त्यानंतर तो घरी येऊन मी मटन घेऊन आलो आहे. त्याची भाजी करून वाढ असे म्हणाला त्यानंतर स्वयंपाक झाल्यावर त्याने जेवण करत असताना पुन्हा माझ्या चारित्र्यावर संशय घेऊन ही मुलं माझी नाहीत असे म्हणून वाद घातला त्यानंतर मी माझ्या मुलांना घेऊन आत झोपले आणि माझा पती बाहेर पलंगावर झोपला त्यानंतर त्याने मध्यरात्री मुलगा अमर याला उचलून आपल्या जवळ झोपायला घेतले.



त्यामुळे मुलाला जवळ घेतले असेल असे वाटून मी शांत झोपी गेले दरम्यान सकाळी उठून बघितले असता पती सिद्धेश्वर आणि मुलगा अमर कुठे दिसले नाही त्यामुळे मी शोधाशोध केली आणि याबाबत सासु सागराबाई यांना विचारले असता त्यांनी मला याबाबत काही माहीत नाही असे सांगितले त्यानंतर माझा पती सिद्धेश्वर घरी आल्यानंतर त्याला अमर बाबत विचारले असता त्यांनी सुरुवातीला मला काहीच माहित नाही सांगितले त्यानंतर मी अमरला सर्वत्र शोधले असता तो मिळून आला नाही.



त्यावेळी मीपुन्हा पतीला विचारले असता त्याने मी अमरला बरोबर पाहिजे त्या ठिकाणी पाठवले असून तुम्हालाही त्या ठिकाणी पाठविनार असल्याचे सांगितले त्यामुळे मी घाबरून याबाबत ची माहिती गावातील बद्रीनाथ गाडगे याला दिली त्यावेळी त्याने माझा पती सिद्धेश्वर ला अमर कुठे आहे या बद्दल विचारले असता त्यांनी आपण अमर ला कोरडी नदीपात्रात फेकले असे सांगितले त्यामुळे गावकरी त्या ठिकाणी अमर ला शोधन्या साठी गेले समोरचे दृश्य बघून गावकऱ्यांच्या काळजाचा थरकाप उडाला.



लोकांनी लगेच त्या निर्दयी बापास पकडून सदर घटनेची माहिती साखरखेर्डा पोलिसांना दिली दरम्यान घटनेची माहिती मिळताच ठाणेदार जितेंद्र आडोळे दुय्यम ठाणेदार सचिन कानडे पोहेका सुरजित सिंग इंगळे पो कॉ अशोक काशीकर पोहेकॉ अनिल वाघ यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि त्या निर्दयी बापास बेड्या ठोकल्या कोराडी नदीपात्रातून चिमुकल्या अमरचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे अमर हा गावातील शाळेत सातव्या इयत्तेत शिकत होता त्याचा खून झाल्याने संपूर्ण गावामध्ये हळहळ व्यक्त होत असून अशा निर्णय पित्यास कठोर शिक्षा करावी अशी मागणी गावकरी करत आहे.

Post a Comment

0 Comments