google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कोरोना काळात देश चालविणाऱ्या बळीराजाला महावितरणने वेठीस धरू नये ; मा.आम.दिपकआबांचा इशारा

Breaking News

कोरोना काळात देश चालविणाऱ्या बळीराजाला महावितरणने वेठीस धरू नये ; मा.आम.दिपकआबांचा इशारा

 कोरोना काळात देश चालविणाऱ्या बळीराजाला महावितरणने वेठीस धरू नये ; मा.आम.दिपकआबांचा इशारा 


शेतकऱ्यांना व जनावरांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवाल तर कार्यालयाला टाळे ठोकू – मा. आम दिपकआबा साळुंखे पाटील

सांगोला : तालुका प्रतिनिधी थकित वीज बिलापोटी महावितरण प्रशासनाने शेतकऱ्यांची विद्युत तोडणी मोहीम हाती घेतली आहे. गेल्या दोन वर्षांपासून सतत लॉकडाऊन व त्यामुळे शेतमालाला समाधानकारक भाव नसल्याने तमाम बळीराजा संकटात सापडला आहे. कोरोनाच्या काळात सर्वांनी आपली दारे बंद करून घेतली असतानाही संपूर्ण देश चालवणाऱ्या बळीराजाला महावितरण प्रशासनाने वेठीस धरू नये अन्यथा प्रशासनाला गंभीर परिणाम भोगावे लागतील शेतकऱ्यांना व जनावरांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवाल तर प्रसंगी महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकू असा इशाराच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिला आहे.


संपूर्ण जग आणि देश अडचणीत असताना अगदी देवांनीही आपली दारे बंद केली होती, अशा वेळी देशातील फक्त शेतकरी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावून देश जगवत होता. यावेळी कधीच शेतकऱ्यांनी नफा- T-तोटा याचा विचार केला नाही. देश जगवतांना स्वतः अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना महावितरण प्रशासनाने थकित वीज बिलापोटी वेठीस धरू नये. कृषिप्रधान संस्कृती असलेल्या आपल्या देशातील शेतकरी कधीच कोणाचे देणे मागे ठेवत नाही.


आज परिस्थितीने अडचणीत आलेल्या बळीराजाला खऱ्या अर्थाने आधाराची आणि मदतीची गरज आहे, अशावेळी महावितरण प्रशासनाने शेतकऱ्यांना थोडीशी सवलत देणे गरजेचे आहे. अचानक महावितरण प्रशासनाने वीज तोडणी मोहीम हाती घेतल्याने रब्बी हंगामातील शेतीपिके पाण्याऐवजी कोमेजू लागली आहेत. तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना व जनावरांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप महावितरण प्रशासनाने करू नये अन्यथा महावितरण प्रशासनाला याची मोठी किंमत मोजावी लागेल.


तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांना सोबत घेऊन महावितरण प्रशासनाच्या या चुकीच्या धोरणाविरुद्ध तीव्र जनआंदोलन उभा करू आणि महावितरणच्या कार्यालयाला कुलप घालू असेही शेवटी मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी ठणकावून सांगितले.


महावितरणच्या धोरणामुळे “आडात आहे पण पोहऱ्यात नाही” सांगोला तालुका दुष्काळी तालुका म्हणून सर्वत्र ओळखला जातो. तीव्र पाणीटंचाई हा येथील शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न असतो. परंतु, यंदा पाऊसकाळ समाधानकारक झाल्याने विहिरी, बोअरवेल, आणि इतर जलस्रोतांना पुरेसे पाणी आहे. त्यामुळे रब्बी हंगामाकडून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. अशातच महावितरणने ऐनवेळी वीज तोडणी मोहीम हाती घेतल्याने शेतकऱ्यांची अवस्था “आडात आहेत पण पोहऱ्यात नाही” अशीच झाली आहे. शेतकरी व त्याच्या दारातील जनावरांची पिण्याच्या पाण्यासाठी गळचेपी करून महावितरणने हे पाप आपल्या माथी घेऊ नये. शेतकऱ्यांना व त्यांच्या जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी गरजेनुसार महावितरणने विज सोडून सहकार्य करावे.

– मा. आम. दिपकआबा साळुंखे-पाटील प्र. उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महा.

Post a Comment

0 Comments