कडबा कुट्टी मशीनमध्ये स्कार्फ आणि केस अडकली , गळफास लागून सोनालीचा दुर्दैवी मृत्यू
पुणे, 17 नोव्हेंबर : जनावरांना चारा कटिंग करणाऱ्या कुट्टी मशीनमध्ये गळ्यातील स्कार्प आणि केस अडकल्यामुळे एका 21 वर्षीय नवविवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यात घडली आहे.सहा महिन्यापूर्वीच या महिलेचं लग्न झालं होतं. तिच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आंबेगाव तालुक्यातील लाखनगाव गावात ही दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना घडली. सोनाली अजय दौंड असं मृत नवविवाहितेचे नाव आहे.
जनावरांना चारा कटिंग करून घालण्याच्या कुट्टी मशीनमध्ये सोनालीचा गळ्यातील स्कार्प आणि केस गुंतले होते. यात सोनालीला गळफास लागल्याने दुर्दैवीरित्या मृत्यू झाला. नेहमीप्रमाणे सोनाली जनावरांसाठी कटिंग मशीनवर चारा काढत होती. पण, अचानक तिची ओढणी कटिंग मशीनमध्ये अडकली काही कळायच्या आता तिच्या मानेला हिसका बसला आणि केसही आत ओढली गेली.
त्यामुळे तिला गळफास बसला. घरातील सदस्यांनी तातडीने धाव घेऊन तिला मशीनपासून बाजूला केले. सासरे सुभाष दौंड हे सकाळी सकाळी 09.45 वाजेच्या सुमारास शेतात मेथीच्या भाजीला तननाशक फवारण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी रस्त्याने नवनाथ लक्ष्मण रोडे व वैभव रामदास पडवळ असे दोघे मोटार सायकलवर जात असताना सुभाष यांनी त्यांना काय झाले? असे विचारले त्यावेळी त्यांनी अजयच्या पत्नीचे केसं कडबा कुट्टी मशीनमध्ये गुंतले आहेत, असे सांगून ते पुढे निघून गेले. त्यामुळे सुभाष यांनी लगेच शेतातून घरी आले. त्यावेळी त्यांचा लहान भाऊ सुनील सोपान दौंड याने सोनालीला कडबा कुट्टी मशीनपासून घराच्या ओट्यावर आणले होते.
त्यावेळी सोनाली हीला पाहिले असता ती काही एक बोलत नव्हती. त्यावेळी तिला लगेच लहान भाऊ सुनिल दौंड व नवनाथ रोडे यांनी खाजगी गाडीने पारगांव इथं नेलं. पोत्यात बांधलेल्या अवस्थेत नदीत आढळला मृतदेह, खळबळजनक घटनेनं कराड हादरलं! तेथून पुढे रुग्णवाहिकेमधून उपचारकामी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय मंचर येथे आणले. मात्र तेथील डॉक्टरांनी सोनालीला तपासून मयत झाल्याचे घोषित केले. याबाबत आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील पोलीस ठाण्यात अकास्मात मयत अशी नोंद करण्यात आली आहे. सोनालीच्या अकास्मात मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
0 Comments