शिवसेना सचिव माननीय खासदार विनायक राऊत साहेब यांची आमदार ॲड.शहाजीबापू पाटील यांच्या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट
सांगोला (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षाचे सचिव, खासदार श्री विनायक राऊत साहेब यांनी शनिवार दि.20 नोव्हेंबर रोजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी सांगोला विधानसभा मतदार संघातील अनेक प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली. मतदार संघातील सुरू असणाऱ्या विविध कामांच्या बाबतीत शहाजीबापूंनी माहिती दिली असता आदरणीय साहेबांनी समाधान व्यक्त केले.
विधानसभा मतदार संघातील सुचविलेल्या प्रत्येक विकास कामाला लागणारा निधी व मान्यता मिळविण्यासाठी बापू मी तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करणार असल्याचे खासदार विनायक राऊत साहेब यांनी सांगितले.
सांगोल्यातील शहाजीबापूंच्या निवासस्थानी खासदार साहेब यांनी भेट देऊन कौटुंबिक व राजकीय बाबीवर सविस्तर चर्चा करून मतदारसंघातील सुरू असणाऱ्या कामावर मी खूप खुश आहे अशी प्रतिक्रिया दिली यावेळी उपस्थित शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर, जिल्हाप्रमुख संभाजी राजे शिंदे, तालुका प्रमुख सुर्यकांत घाडगे, नगरसेवक आनंद काका घोंगडे, नगरसेवक सोमेश यावलकर, शहरप्रमुख कमरुद्दीन खतीब, युवा नेते गुंडा दादा खटकाळे, समीर पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
0 Comments