Solapurजिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी ६५ लाखांच्या मंजूरीसाठी मागितली लाच; सभापती अनिल मोटेंचा आरोप
प्रतिनिधी, सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी ६५ लाखांच्या मंजूरीसाठी मागितली लाच; सभापती अनिल मोटेंचा आरोप तीन महिने कार्यात्तर मंजूरीची फाईल त्यांनी दडवून ठेवली होती. सातत्याने टक्केवारीची मागणी करण्यात येत होती. परिणामी आरोग्य विभागाचा ७ कोटींचा निधी शासनाकडे परत गेला होता.
सोलापूर : आरोग्य विभागाच्या प्राथमिक उपचार केंद्राच्या ६५ लाखांच्या कार्यात्तर मंजूरीसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द कांबळे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक सुर्यकांत मोहीते यांनी एक टक्याची लाच मागितल्याचा आरोप कृषी पशूसंर्वधन सभापती अनिल मोटे (Anil Mote) यांनी पत्रकार परिषदेत केला. मंजूरीसाठी मागत असलेल्या टक्केवारीचा सभापती मोटे यांनी व्हिडीओ व्हायरल केला आहे.
पुढे बोलताना सभापती मोटे म्हणाले, तीन महिने कार्यात्तर मंजूरीची फाईल त्यांनी दडवून ठेवली होती. सातत्याने टक्केवारीची मागणी करण्यात येत होती. परिणामी आरोग्य विभागाचा ७ कोटींचा निधी शासनाकडे परत गेला होता. टक्केवारीची मागणी होत असताना मी कधी कोणाला टक्केवारी दिली नाही. त्यामुळे मी तुम्हाला टक्केवारी देऊ शकत नाही, असे सभापती मोटे सांगत असताना अध्यक्ष कांबळे म्हणाले, ४ कोटी ५० लाख मला फ़ेड करायचे आहेत, असा संवाद व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झाला आहे.
दरम्यान, सभापती मोटे आणि भाजप सदस्य अतुल पवार यांच्यात घेरडी येथील गाळे बांधकाम कर्ज प्रकरणावरून शाब्दिक चकमक उडत असताना अध्यक्ष कांबळे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने मोठी खळबळ जिल्हा परिषद वर्तुळात उडाली आहे.
0 Comments