google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 " वर्षात घरकुल पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांना नोटीस "

Breaking News

" वर्षात घरकुल पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांना नोटीस "

 " वर्षात घरकुल पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांना नोटीस " ज्या लाभार्थ्यांनी बारा महिन्यांमध्ये घरकुल पूर्ण केले नाही अशा लाभार्थ्यांनाही नोटीस देण्याची सूचना त्यांनी केली आहे .


सोलापूर: केंद्र व राज्य शासन पुरस्कृत योजनेतून जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या एकूण घरकुलांपैकी 14 हजार 982 घरकुले अपूर्ण आहेत.ती घरकुले पूर्ण करण्यासाठी जिल्हास्तरावरून ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, डाटा ऑपरेटर, विस्ताराधिकारी, कनिष्ठ सहाय्यक यांचा आढावा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष धोत्रे यांनी घेतला आहे. डिसेंबर अखेर सर्व घरकुले पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. ज्या लाभार्थ्यांनी बारा महिन्यांमध्ये घरकुल पूर्ण केले नाही अशा लाभार्थ्यांनाही नोटीस देण्याची सूचना त्यांनी केली आहे.


जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या विविध कामकाजाचा आढावा त्यांनी घेतला. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेचे 2016-17 ते 2020-21 अखेर 36 हजार 424 घरकुले मंजूर झाली आहेत. त्यापैकी 35 हजार 565 घरकुलांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. उर्वरित 859 लाभार्थ्यांना हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पहिला हप्ता वितरित केलेल्या लाभार्थ्यांपैकी 24 हजार 435 घरकुले पूर्ण झाली आहेत.


राज्य पुरस्कृत आवास योजनेतून 2016-17 ते 2020-21 अखेर जिल्ह्यासाठी 15 हजार 279 घरकुले मंजूर आहेत. मंजूर लाभार्थ्यांपैकी 14 हजार 915 लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. त्यापैकी 12 हजार 473 घरकुल पूर्ण झाले असल्याची माहितीही अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धोत्रे यांनी दिली.

घरकुल कामकाजाबाबत तालुका, ग्रामपंचायत स्तरावर विशेष बैठक घेऊन अपूर्ण घरकुले व डिले हाऊस पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी डेमो हाऊस मंजूर करण्यात आले असून दहा डेमो हाऊस पैकी आठ डेमो हाऊसचे काम पूर्ण झाले आहे.

- संतोष धोत्रे, प्रकल्प संचालक तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी

Post a Comment

0 Comments