google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आता विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवावी लागणार; आरोग्यमंत्री टोपेंच महत्वाचं विधान -

Breaking News

आता विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवावी लागणार; आरोग्यमंत्री टोपेंच महत्वाचं विधान -

 आता विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवावी लागणार; आरोग्यमंत्री टोपेंच महत्वाचं विधान -


राज्यातील कोरोना स्थिती आटोक्यात आली असल्याने राज्य सरकारच्या महाविद्यालयांना आजपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान महाविद्यालयातील विध्यार्थ्यांच्या लसीकरणाच्या मुद्द्यावरुन आरोग्यमंत्री राजेश टोपे महत्वाचे विधान केले आहे. यापुढे 18 वर्षाच्या पुढील विद्यार्थ्यांचे लसीकरण आपल्याला करावे लागेल. त्यासाठी विशेष मोहीम राबवावी लागणार असल्याचे डॉ. टोपे यांनी म्हंटले आहे.


आरोग्यमंत्री डॉ. टोपे यांनी माद्यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, कोरोना निर्बंध शिथिल केल्यानंतर तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. जगात सर्वत्र तिसरी लाट आलेली आहे. मात्र, ती लाट सौम्य होती आणि त्याची दाहकता तेवढी दिसली नाही. मिशन कवचकुंडल अभियान आपण दसऱ्यापर्यंत ठेवले होते. ते आता आपण दिवाळीपर्यंत वाढविले आहे. आजपासून महाविद्यालयांना सुरुवात झाली आहे. काही महाविद्यालयात विद्यार्थ्यांना लशी देण्यात आलेल्या आहेत. मी काल उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी महाविद्यालये सुरु करण्याबाबत बोललो. त्यांनी जो निर्णय घेतला आहे त्याचं स्वागतच आहे.

Post a Comment

0 Comments