google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार - डॉक्टरने रुग्णाची ' किडनी'च काढली

Breaking News

हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार - डॉक्टरने रुग्णाची ' किडनी'च काढली

 हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार - डॉक्टरने रुग्णाची ' किडनी'च काढली


गुजरातमधील एका रुग्णालयात अजब घटना घडल्याची माहिती समोर आली आहे . एक रुग्ण किडनी स्टोनच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाला होता , परंतु डॉक्टरने त्याची किडनीच काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला . यामुळे संबंधित व्यक्तीचा 4 महिन्यांनी मृत्यूही झाला . दरम्यान , यानंतर गुजरात राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाने बालासिनोर येथील केएमजी रुग्णालयाला 11.23 लाखांची नुकसान भरपाई रुग्णाच्या कुटुंबीयांना देण्याचे आदेश दिले आहेत . दरम्यान , आयोगाने प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रुपात रुग्णालय यासाठी जबाबदार असल्याचे म्हटले आहे .किडनी स्टोनसाठी दाखल करण्यात आले होते खेडा जिल्ह्यातील वांगरोली गावातील देवेंद्रभाई रावल यांनी आपल्या होत असलेल्या त्रासानंतर केएमजी जनरल रुग्णलयातील डॉ . शिवूभाई पटेल यांच्याशी संपर्क साधला होता . मे 2011 मध्ये त्यांना किडनी स्टोनचा त्रास असल्याची माहिती मिळाली . त्यानंतर त्यांना अन्य सुविधाही मिळाव्या यासाठी दुसऱ्या रुग्णालयाचा पर्याय सुचवला . परंतु रावल यांनी त्याच रुग्णालयात उपचार करण्याची इच्छा व्यक्त केली . 3 सप्टेंबर 2011 रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली . परंतु शस्त्रक्रियेदरम्यान , त्यांची किडनीच काढल्याचे सांगितल्यानंतर कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला . तसेच रुग्णाच्या आरोग्याच्या दृष्टीने निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले . रुग्णालयाला नुकसान भरपाई देण्याचे आदेश यानंतर रावल कुटुंबीयांनी जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाशी संपर्क साधला . या ठिकाणी उपचारात निष्काळजीपणाचा ठपका ठेवत आयोगानं डॉक्टर , रुग्णालय आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडला 11.23 लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले . परंतु नुकसान भरपाई कोण देणार यासाठी पुन्हा अपील करण्यात आले .

Post a Comment

0 Comments