गेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीने केला आरपीआय (आठवले गट) पक्षाचा विश्वासघात : जिल्हा उपाध्यक्ष अरुण आण्णा बनसोडे
आठवले साहेबांच्या आरपीआय पक्षाला सन्मान देणाऱ्या पक्षाबरोबरच युती करणार
सांगोला/प्रतिनिधी :गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत महायुतीने नगरपालिकेची निवडणूक लढवली होती. त्यामध्ये माहायुतीचा आर.पी.आय. हा घटक पक्ष होता. म्हणून नगरपालिकेची निवडणूक व जिल्हा परिषद पंचायत समिती व लोकसभा निवडणूक आर.पी.आयने सर्व ताकदीनिशी मदत केली. परंतु महायुतीने स्वीकृत नगरसेवक हे पद देतो असे आश्वासन देऊनही पाच वर्षे आर.पी.आयला स्वीकृत सदस्य पद दिले नाही. सदर चे पद हे आर्थिक वाटाघाटी करून ज्यांचा राजकारणाशी पक्ष पार्टीशी कसलाहि संबंध नसताना केवळ आर्थिक देवाण-घेवाण करून हे पद दुसऱ्याला दिले.
शिवाय आर.पी.आय. चे नगरसेवक म्हणून जाहीर केले होते त्यांचाही आर.पी.आयशी कसलाही संबंध नाही. जे उमेदवार शिवसेनेच्या वाट्याला आले होते परंतु त्यांना ऐनवेळी आर.पी.आय. म्हणून पुरस्कृत करण्यात आले निवडणुकीनंतर त्याही उमेदवारांनी आर.पी.आय. शी कसलाही संबंध ठेवला नाही. त्यामुळे त्यांना आर.पी.आय. उमेदवार किंवा नगरसेवक म्हणता येणार नाही. गेल्या वर्षी सारखे इतर पक्षाच्या आहे त्या उमेदवाराला आर.पी.आय. पुरस्कृत म्हणून घोषित करण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आर.पी.आयची युती भाजप बरोबर असून भाजपने आर.पी.आयला सोबत घेऊन निवडणूक लढवावी. भाजप इतर पक्षाबरोबर किंवा गटाबरोबर आघाडी करत असेल तर त्यांनी त्या युतीत किंवा आघाडीत आर.पी.आय. ला किती जागा सोडणार आहे याची चर्चा करावी. शिवाय आर.पी.आयला काही जागा सोडत असतील तर ते उमेदवार
आर.पी.आय. रीतसर पदाधिकारी आर.पी.आय. मध्ये काम केलेले असावेत. जर अशा उमेदवारांना उमेदवारी न देता इतर पक्षाच्या उमेदवारांना आर.पी.आय. म्हणून घोषित केल्यास आर.पी.आय. त्यांना बांधील राहणार नाही. सदरचा प्रकार रामदास आठवले साहेब यांच्या निदर्शनास आणून देऊन पक्षहितासाठी व आठवले साहेबांच्या सन्मानासाठी आर.पी.आय. वेगळा विचार केल्याशिवाय राहणार नाही असे मत आर.पी.आयचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण आण्णा बनसोडे यांनी व्यक्त केले आहे.
0 Comments