google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शहरातील प्रभाग क्र. 7 येथील विकासकामांचा शुभारंभ संपन्न

Breaking News

शहरातील प्रभाग क्र. 7 येथील विकासकामांचा शुभारंभ संपन्न

शहरातील प्रभाग क्र. 7 येथील विकासकामांचा शुभारंभ संपन्न


सांगोला/प्रतिनिधी :
सांगोला शहरातील प्रभाग क्र. 7 शिवाजीनगर या भागातील 40 फुटी रोड ते सतीश कोळी घर रस्ता काँक्रीटीकरण व आरसीसी गटार करणे- कामाची रक्कम रु. 16 लाख 36 हजार 140 रु. या कामाचा शुभारंभ लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांच्या हस्ते करण्यात आला.
सदरचे काम लोकशाहीर आण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत सुरू करण्यात आले आहे. यावेळी उपनगराध्यक्ष प्रशांत धनवजीर, बांधकाम सभापती अप्सराताई ठोकळे, आरोग्य सभापती रफिक तांबोळी, गटनेते/नगरसेवक आनंदा माने, नगरसेविका सौ. स्वातीताई मगर, नगरसेविका सौ. छायाताई मेटकरी, नगरसेवक सुरेश माळी, नगरसेवक गजानन बनकर, रमेश जाधव, राजू मगर, अमोल खरात, रामचंद्र ढोबळे, पत्रकार रवी साबळे, पत्रकार किशोर म्हमाणे, माणिक ढोबळे, सुरेश गाडेकर, प्राचार्य अशोक शिंदे सर, दत्तराज शिंदे, सौ. नीता ढोबळे, डॉ. प्रेरणा ढोबळे, ठेकेदार शितल लादे, शिवाजी भंडारे, मुंडे सर, संदीप लादे, रणजीत लादे, दादा बनसोडे आदी उपस्थित होते.
फोटो -

Post a Comment

0 Comments