सर्व सांगोलकरांना नम्र आवाहन !शहरातील काही घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन 5 व्या,7 व्या दिवशी होने अपेक्षित आहेत.
दरवर्षी प्रमाणे आपण सर्वांनी अतिशय उत्साहाने,हर्षाने श्री गणेशाची आपल्या घरी प्रतिष्ठापना केली.शहरातील काही घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन 5 व्या,7 व्या दिवशी होने अपेक्षित आहेत.
परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशाच्या विसर्जनाच्या बाबतीत आपण सर्वांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. आपल्याला संभाव्य कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी विसर्जनासाठी विहिरींपर्यंत येऊन गर्दी करणे टाळायचे आहे.नागरिकांना श्री गणेश मूर्तींचे विसर्जन विहिरींमध्ये करणे अनुज्ञनेय असणार नाही. त्यामुळे सांगोला नगरपरिषदेमार्फत सर्व सांगोलकरांना विनंती करण्यात येते की आपण श्री.गणेश विसर्जनासाठी खालील 3 पैकी एका मार्गाचा अवलंब करावा:
(1) सांगोलकरांनी घरगुती गणेशाचे विसर्जन घरीच करावे
किंवा
(2) सांगोलकरांनी गणेश मुर्त्या नजीकच्या गणेश मंडळात जमा कराव्यात
किंवा
(3) सांगोलकरांनी श्री गणेश मुर्त्या नगरपरिषदे मार्फत तयार केलेल्या "मूर्ती संकलन केंद्रात" जमा कराव्यात.
सांगोला नगरपरिषदे मार्फत तयार केलेली 'मूर्ती संकलन केंद्र'
1. वंदे मातरम चौक
2. पंचायत समिती शेजारी
3. आठवडा बाजार (बाहेरील विहीर)
4. कुंभार गल्ली विहीर
5. न्यू इंग्लिश स्कूल मैदान
6. मिरज रोड रेल्वे फाटक (साई नाश्ता शेजारी)
7. सांगोला नगरपालिका
वरील 7 मूर्ती संकलन केंद्रांवर जमा केल्या जाणाऱ्या श्री गणेश मूर्त्यांचे सांगोला नगरपरिषदे मार्फत विधीपूर्वक विसर्जन रथा द्वारे "वाढेगाव रोड,मान नदी" याठिकाणी करण्यात येणार आहे.त्यामुळे आपल्या बाप्पा ना तिसऱ्या लाटेच निमित्त होऊ न देण्यासाठी आपण सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे. विसर्जनाची गर्दी टाळू,संभाव्य तिसऱ्या लाटेला प्रतिबंध करू !
0 Comments