लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांच्या 15% निधीतून 58 लाख रूपयांची कामे चालू
सांगोला/प्रतिनिधी ःसांगोला नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांच्या 15% निधीमधून 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये सुमारे 58 लाख रूपयांची कामे करण्यात येणार असून यामधील काही कामे पूर्ण करण्यात आली आहेत तर काही कामे चालू आहेत.
महाराष्ट्रामध्ये 2016 साली नगरपरिषदेच्या निवडणुका पार पडल्यानंतर काही ठिकाणी लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडून आले परंतू त्याठिकाणी त्यांचे बहुमत आले नसल्यामुळे कामे करण्यास विरोधकांकडून अडचणी निर्माण करण्यात येत होत्या. यामुळेच राज्य शासनाकडून थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांना एकूण निधीच्या 15% निधी विकास कामांसाठी खर्च करता यावा म्हणून अध्यादेश काढण्यात आला. याच नियमाचा सदुपयोग करत सांगोला नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा यांच्या 15% निधीमधून शहरामध्ये विविध विकासकामे करण्यात आली. यामध्ये सन 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये सुमारे 58 लाख रूपयांची कामे करण्यात येणार असून काही कामे पूर्ण झाली आहेत तर काही कामे चालू स्थितीमध्ये आहेत.
यामध्ये शहरामध्ये विविध ठिकाणी विद्युत पोल टाकणे (27+13) एकूण 40 पोल- 2 लाख 99 हजार रू, नडगिरे घर ते भारत गडहिरे घर गटार करणे- 1 लाख 97 हजार 246 रू, अशोक हाके घरासमोर ते महिला सार्व. मुतारीपर्यंत आरसीसी गटार करणे- 1 लाख 97 हजार 221 रू, महिला सार्व. मुतारी ते गणेश लॉजपर्यंत आरसीसी गटार करणे- 1 लाख 92 हजार 766 रू, चिंचोली रोड इंगोले घर ते तानाजी श्रीराम घर गटार करणे- 1 लाख 99 हजार 935 रू, राजू गावडे घर ते चिंचोली रोडपर्यंत आरसीसी गटार करणे- 1 लाख 98 हजार 956 रू, भारत गल्ली येथे सहदेव खंदारे ते बाबूराव खंदारे आरसीसी गटार करणे- 1 लाख 96 हजार 9 रू, विनोद खंदारे घर ते अमोल खंदारे घर गटार करणे- 1 लाख 88 हजार 174 रू, शशिकांत खंदारे घर ते सोमनाथ खंदारे घर गटार करणे- 1 लाख 88 हजार 625 रू, समीर इनामदार घर ते शफी इनामदार घर गटार करणे- 1 लाख 84 हजार 142 रू, बागवान घर ते नडगिरे घर गटार करणे- 90 हजार रू, चिंचोली रोड पवार वस्ती येथे कॅनॉलपासून ते अण्णा पवार घरापर्यंत पाईपलाईन टाकणे- 1 लाख 5 हजार रू, वाढेगांव रोड बंधन पॅलेस रस्ता ते शंकर मेटकरी घर ते बिरूदेव गेजगे घर पाईपलाईन टाकणे- 1 लाख 84 हजार रू, बुरांडे वस्ती कुंडलिक गायकवाड घर ते इनामदार घर ते जमादार घर पाईपलाईन टाकणे- 91 हजार रू, देशपांडे गल्ली देशपांडे घर ते मेन रोडपर्यंत गटार करणे- 1 लाख 79 हजार 645 रू, देशपांडे घर ते मेन रोड बोळ काँक्रीटीकरण करणे- 1 लाख 94 हजार 618 रू, खंडागळे वस्ती येथे हरिदास खंडागळे घर येथे सीडी वर्क करणे- 1 लाख 6 हजार 29 रू, चिंचोली रोड अण्णा पवार घराकडे जाणार्या रस्यावर सीडी वर्क करणे- 1 लाख 4 हजार 29 रू, चिंचोली रोड शब्बीर मुलाणी घराकडे जाणार्या रस्त्यावर सीडी वर्क करणे- 1 लाख 2 हजार 29 रू, इंदिरानगर येथे तय्यब बागवान यांच्या घरासमोर आरसीसी गटार व पेव्हींग ब्लॉक टाकणे- 1 लाख 33 हजार 358 रू, सनगर गल्ली येथे ज्ञानेश्वर धतिंगे घर ते मेन रोडपर्यंत आरसीसी गटार करणे- 1 लाख 49 हजार 82 रू, सनगर गल्ली येथे ज्ञानेश्वर धतिंगे घर ते मेन रोड पर्यंत पेव्हींग ब्लॉक टाकणे- 1 लाख 78 हजार 209 रू, अलराईन नगर मुख्य रस्त्यापासून ते पत्की घरापर्यंत रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे- 1 लाख 95 हजार 484 रू, अलराईन नगर येथे कवडे प्लॉट ते काशिद घरापर्यंत रस्ता मुरमीकरण खडीकरण करणे- 1 लाख 74 हजार 906 रू, अलराईन नगर येथे मेन रोड पासून संजय देशमाने प्लॉटपर्यंत रस्ता मुरमीकरण खडीकरण करणे- 1 लाख 47 हजार 359 रू, अलराईन नगर येथे दयानंद गुळमिरे घर ते गोदावरी हॉस्पिटलपर्यंत रस्ता मुरमीकरण खडीकरण करणे- 1 लाख 31 हजार 429 रू, बुंजकर वस्ती येथे सीडी वर्क दुरूस्ती करणे- 87 हजार 158 रू, मुजावर गल्ली येथे हाफीज मुजावर घरासमोर गटार करणे व पेव्हींग ब्लॉक बसविणे- 39 हजार 198 रू, चिंचोली रोड सदाशिव लोहार यांच्या घराकडे जाणारा रस्त्याला सीडी वर्क करणे- 1 लाख 21 हजार 226 रू, चिंचोली रोड येथे इनामदार गुरूजी घराकडे जाणार्या रस्त्यावर सीडी वर्क करणे- 1 लाख 11 हजार 723 रू, मारूती मंदिर येथे डागडुजी करणे- 46 हजार 137 रू, मुजावर गल्ली येथे जाकीर मुजावर घर ते मस्जिद मुलाणी घरापर्यंत आरसीसी गटार करणे- 1 लाख 86 हजार 115 रू, साठेनगर येथील शौचालयाजवळ भिंत बांधणे- 1 लाख 7 हजार 280 रू, भारत गल्ली येथे अमोल खंदारे घर ते काळी मस्जीद कॉर्नर रस्ता डांबरीकण करणे- 1 लाख 5 हजार 834 रू, जुना आ.क्र. 46 बगीचासमोर काँक्रीटीकरण करणे- 1 लाख 98 हजार 314 रू, जुना आ.क्र. 46 बगीचासमोर पेव्हींग ब्लॉक टाकणे- 1 लाख 99 हजार 395 रू, अण्णाभाऊ साठेनगर येथे कांबळे घर ते बापू वाघमारे घरापर्यंत आरसीसी गटार करणे- 1 लाख 12 हजार 41 रू, इंदिरानगर मधील अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करणे, अलराईन नगर येथे असगर पठाण घर ते मस्जीदपर्यंत आरसीसी गटार करणे अशी एकूण 39 कामे नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांच्या 15% निधीमधून पूर्ण होणार आहेत.
बहुमत नसल्याकारणाने मोठ्या कामांना मंजूरी मिळत नव्हती. परंतू यामधून निराश न होता नगराध्यक्षा यांच्या 15% निधीमधून शहरातील विविध छोटी-मोठी कामे पूर्णत्वास नेली आहेत. यामध्ये चालू वर्षातून 58 लाख रूपयांची कामे करण्यात येणार असून यामधील काही कामे पूर्ण करण्यात आली आहेत तर काही कामे चालू असून ती सुध्दा लवकरच पुर्ण होतील.
- आनंदा माने, नगरसेवक तथा गटनेते महायुती
0 Comments