गौडवाडी ता.मौजेसांगोला गावच्या शिवारात बुध्देहाळ तळयातील पाण्यात अनोळखी मृतदेह सापडला
सांगोला पोलीस ठाणे गु.रजि.नं.878/2021 भादवि कलम 302,201 हा गुन्हा दिनांक 15/07/2021 रोजी दाखल आहे.
मयताचे नावः-अनोळखी पुरुष जातीचे,अंदाजे वय 40 ते 45 वर्षे गुन्हा घडला तारीख वेळ ठिकाणः- 15/07/2021 रोजीचे 16ः17 वा. चे पुर्वी दाखल तारीख वेळ ठिकाणः- 15/07/2021 रोजी 21ः53 वाजता गुन्हायाची हकीकतः-यातील पुरूष जातीच्या अदांजे वय 40 ते 45 वर्षे वयाच्या अनोळखी इसमाचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने,अज्ञात कारणावरुन अज्ञात हत्याराने डोके, हात कापुन खुन केला व पुरावा नाहीसा करण्याच्या उद्देशाने डोके नसलेले खांदयापासुन खालील भाग असलेले प्रेत हिरवे-पांढरे रंगाच्या चटईमध्ये व निळया व लाल रंगाच्या शेडनेटमध्ये सफेद रंगाच्या सुताच्या दोरीने बांधुन त्यास सुमारे 10 ते 12 किलो वजनाचा दगड दोरीने बांधुन मौजे-गौडवाडी ता.सांगोला गावच्या शिवारात बुध्देहाळ तळयातील पाण्यात टाकुन दिले आहे.म्हणून वगैरे मजकुराचा गुन्हा रजि.दाखल करण्यात आला आहे.मृतदेहचे वर्णन खालीलप्रमाणेः- एक अनोळखी पुरुष जातीचा इसम वय अंदाजे 40 ते 45 वर्षे नेसणीस अंगावर आकाशी निळया रंगाचा टी-शर्ट,काळया रंगाची काॅटन 34 सेमी जिन्स पॅन्ट,व तपकिरी रंगाची डिक्सी स्काॅट कंपनीची 100 सेमी. अंडरवेअर, लोखंडी लाल रंगाचे बक्कल असलेला कंबरेचा बेल्ट बक्कल वर HAEअसे लिहलेले.उंची अंदाजे 5 फूट 6 इंच सदरचा इसमाच्या ओळखीबाबत तसेच अज्ञात आरोपीतांबाबत शोध होण्यासाठी आपण हा मेसेज आपल्या पुरता मर्यादीत न ठेवता आपल्या मित्र परीवारांध्ये,कामाच्या ठिकाणी, नातेवाईक यांचे सर्व व्हाॅट्सप ग्रुप, पत्रकार ग्रुप,सामाजिक कार्यकर्ते ग्रुपवर प्रसारीत करून सदर अनोळखी मयताचा,त्याच्या नातेवाईकांचा व आरोपीचा शोध होणेस व मिळून आल्यास सांगोला पोलीस ठाणेस कळविण्यास विनंती आहे.
तपासः- प्रशांत हुले,सहा.पोलिस निरीक्षक,सांगोला पोलीस ठाणे
संपर्कः-सुहास जगताप, पोलीस निरीक्षक मो.नं. 7972713292,2)प्रशांत हुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक, मो.नं.9702914007, 9922471007,3)सांगोला पोलीस ठाणे 02187-220100
टिपः- वर नमूद इसमाच्या ओळखीबाबत किंवा आरोपीच्या ओळखीबाबत माहीती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल व माहीती सांगणाऱ्यास पैशाच्या स्वरूपात योग्य ते बक्षीस दिले जाईल.
0 Comments