पंढरपूर : कोरोनाच्या लसीचा डोस घेतल्यानंतर मानवी शरीराला स्टीलच्या वस्तू चिकटल्याचा प्रकार नाशिक येथे अरविंद सोनार यांच्याबाबत घडला होता .
त्यानंतर विठ्ठलाच्या पंढरपुरातही नरहरी कुलकर्णी यांनी कोरोनाची दुसरी लस घेतल्यानंतर एक तासाने यांच्या शरीराला स्टीलच्या वस्तू व पैशाचे नाणे चिटकू लागल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली .
पंढरपुरात बघता बघता हा कुतूहलाचा विषय बनला . याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की , नाशिक येथील अरविंद सोनार यांनी कोरोनाची लस घेतल्यानंतर स्टीलच्या वस्तू चिटकू लागल्याची बातमी टीव्हीवर पाहिली व आपणही तो प्रयोग करून पाहावा या उद्देशाने आज पंढरपूरमधील कुंभार घाट येथे राहणाऱ्या नरहरी कुलकर्णी यांनी सकाळी साडे दहाच्या दरम्यान कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. " घरी आल्यानंतर त्यांनी सहज स्टिलचे नाणे आणि चमचे हे आपल्या शरीराला चिकटतात का हे पाहिले असता त्यांच्या ही शरीराला स्टिलच्या वस्तू चिकटत असल्याचे निदर्शनास आले . नाशिकची पुनरावृत्ती विठ्ठलाच्या पंढरीत घडल्यानंतर या घटनेची चर्चा पसरताच अनेकांनी कुलकर्णी यांच्या घरी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली व पाहता पाहता हा कुतूहलाचा विषय बनला . सुरुवातीच्या दोन तासांमध्ये तीव्रता अधिक कोरोनाची लस घेतल्यानंतर सुरुवातीच्या दोन तासांमध्ये या वस्तू अधिक तीव्रतेने चिकटत असल्याचा दावा त्यांनी केला . दरम्यान कोरोनाची लस घेण्यामध्ये कोणताही धोका नसल्याचे सांगितले आणि कोरोना लस घेतल्यानंतर कोणताही त्रास होत नसल्याचेही त्यांनी सांगितले .कोरोनाची लस सर्वांनी घ्यावी . त्यामुळे कोणताही त्रास होत नाही . फक्त प्रयोग केला आणि मलाही याची प्रचिती आली असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले .
0 Comments