google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वांग्याची भाजी दिली नाही म्हणून पत्नीला पेटवले

Breaking News

वांग्याची भाजी दिली नाही म्हणून पत्नीला पेटवले

 लातूर : पुढारी वृत्तसेवा ; जेवणात वांग्याची भाजी का दिली नाही म्हणून पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये घडली .


ही घटना लातूरच्या उदगीर तालुक्यातील हेर येथे घडली . फरजाना शादुल शेख असे पीडितिचे नाव असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे . शादुल शेख असे आरोपी पतीचे नाव आहे . याच्याविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे .याबाबत माहिती अशी की , शादुल शेख हा लग्न झाल्यापासून फरजानाला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता . ८ जून रोजी फरजानाने सकाळी ८ वाजता स्वयंपाक केला होता . पतीला तिने जेवण्याची विनंती केली परंतु तो न जेवता बाहेर गेला रात्री नऊच्या सुमारास घरी आला होता .  हायकोर्ट पत्नीने पतीसाठी जेवण वाढले . त्याने सकाळी केलेली वांग्याची भाजी मागितली . परंतु ती सकाळीच संपल्याचे पत्नीने सांगितले . यानंतर पतीचा राग अनावर झाला . वांग्याची भाजी का दिली नाहीस म्हणून पती शादुल शेखने बाटलीतील रॉकेल फरजानाच्या अंगावर ओतले आणि तिला पेटवून दिले . यामध्ये ती २५ टक्के भाजली . फरजानाने आरडाओरड केली ती ऐकून शेजारीपाजारी मदतीला धावले व त्यांनी आग विझवली . फरजानावर लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत . या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि नौशाद पठाण हे करीत आहेत .

Post a Comment

0 Comments