google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 " ' पुण्याला चालला कर्नाटकचा गुटखा -सांगोला पोलीसानी दाखविला कायदयाचा फटका

Breaking News

" ' पुण्याला चालला कर्नाटकचा गुटखा -सांगोला पोलीसानी दाखविला कायदयाचा फटका

 " ' पुण्याला चालला कर्नाटकचा गुटखा -सांगोला पोलीसानी दाखविला कायदयाचा फटका मा . पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम , मा . अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे साो , मा . उपविभागीय अधिकारी मा . राजश्री पाटील मॅडम मंगळवेढा विभाग तसेच पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर


सांगोला पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना कोव्हीड १ ९ चा प्रादुर्भाव रोखणेकरीता कारवाईसाठी सांगोला शहरात पोलीस गस्त चालु असताना दि . ०५/०५/२०२१ रोजी दुपारी ०३:०० वाचे सुमारास पोना . महेश पवार व पोकॉ . सचीन देशमुख याना चिंचोली रोड , यंदे मातरम् चौक सांगोला येथे एमएच १४ जीडी ५२४४ हा आयशर टेंपो संशयास्पद स्थितीत मिळुन आला .

त्यावरील चालक हसन सिराज शेख रा , कोंढवा बु ।। पुणे तसेच अल्लाबक्ष अब्दुलगनी बागवान रा . जळकोट ता . तुळजापुर जि . उस्मानाबाद यांच्याकडे कसुन चौकशी केली असता त्यानी टॅपोमध्ये विमल पान मसाला , तंबाखुजन्य जर्दा व बोंबील , भुसा , कांदे असल्याची माहिती दिलेने सदर टेंपो सांगोला पोलीस ठाणे येथे आणण्यात आला . सदर टेंपोची सपोफौ . कल्याण ढवणे यानी दोन पंचासमक्ष तपासणी व पंचनामा केला असता त्यामध्ये विमल पानमसाला ५,८२,१२० + ५,६१,००० + १,२०,००० , व्ही -१ सुगंधीत तंबाखु ६ ९ ३०० + १,३२,००० , अशी एकुण ४१ पोती १४६४४२० / - रु किमतीचा विमल पान मसाला गुटखा व एमएच १४ जीडी ५२४४ आयशर टेंपो ५,००,000 रु असा एकुण १ ९ , ६४ , ४२० रुपये चा ऐवज मिळुन आलेने लागलीच याबाबत मंगेश मल्हारी लवटे वय : ३४ , धंदा : नोकरी , सहा . आयुक्त यांचे कार्यालय अन्न व औषध प्रशासन , म.रा. सोलापुर प्रशासकिय इमारत २ रा मजला , जिल्हाधिकारी यांचे कार्यालय परीसर सोलापुर याना कळविण्यात आले . त्याप्रमाणे त्यानी पथकासह दि . ०६/०५/२०२१ रोजी सांगोला पोलीस ठाणे येथे येवुन मिळुन आलेल्या मालाची तपासणी करुन सदरचा गुटखा , पानमसाला व सुगंधीत तंबाखु ही महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधीत असतानाही त्याची विक्री करण्याच्या उद्देशाने साठा वाहतुक करुन अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ चा भंग केला असल्याबाबत दोन्ही चालक व बालाजी कर्ली पुणे अशा आरोपींविरुध्द सविस्तर तकार दिलेने गुन्हा दाखल झालेला आहे . सदर टेंपोमध्ये गुटखा भरला असल्याचे कोणास कळु नये व गुटखा पकडला जावु नये याकरीता दोन्ही चालकानी टेंपोत वरील बाजुस घाणेरडा वास येत असलेले बोंबील , भुसा , कांदे , टोमॅटो , आले असे भरुन तरकारी असल्याचा देखावा निर्माण केला असतानाही पोलीसांच्या नजरेतुन गुटखा लपला गेला नाही व मोठी कारवाई करण्यात आली आहे . सदर गुन्हयाचा तपास पो . नि . भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोफौ . कल्याण ढवणे हे करीत आहेत . कोरोना कोव्हीड १ ९ चा प्रादुर्भाव रोखणेकरीता प्रशासनाकडुन देण्यात आलेल्या आदेशाचे सर्वानी पालन करावे , कोणीही नियमांचा भंग करून बेकायदेशीर कृत्य , अवैध वाळु वाहतुक , अवैध गुटखा - दारु विक्री - साठा - वाहतुक करीत असल्याचे निदर्शनास आल्यास किंवा विनाकारण बाहेर फिरणे , मास्क न लावणे असा प्रकार करताना आढळुन आल्यास गुन्हा दाखल करुन रिमांड घेवुन जेलमध्ये टाकण्यात येईल असे पोनि . भगवान निंबाळकर यानी कळविले आहे . भगवान निंबाळकर पोलीस निरीक्षक सांगोला पोलीस ठाणे , सांगोला

Post a Comment

0 Comments