google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 किसान रेल्वेच्या भाडेदरात मार्च 2022 पर्यंत 50 टक्के सवलत - चेतनसिंह केदार-सावंत

Breaking News

किसान रेल्वेच्या भाडेदरात मार्च 2022 पर्यंत 50 टक्के सवलत - चेतनसिंह केदार-सावंत

 किसान रेल्वेच्या भाडेदरात मार्च 2022 पर्यंत 50 टक्के सवलत - चेतनसिंह केदार-सावंत

सांगोला (तालुका प्रतिनिधी): शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ऑपरेशन ग्रीन्स –टॉप टू टोटल अंतर्गत किसान रेल्वेंद्वारे फळे, भाजीपाला, शेतीमालाच्या वाहतुकीवर 50 टक्के वाहतूक दर सवलत देण्याची घोषणा केली होती.  किसान रेल्वेला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने किसान रेल्वेतून वाहतुकीसाठी 50 टक्के भाडे दरात सवलत देण्याचा निर्णय 31 मार्च 2022 पर्यंत वाढवला असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.भारतीय रेल्वेने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला चांगली बाजारपेठ प्राप्त व्हावी, यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महाराष्ट्रातून पहिली किसान रेल्वे सुरू केली. नाशवंत शेतीमालाची कमी वेळात आणि कमी दरात वाहतूक व्हावी यासाठी ऑपरेशन ग्रीन अंतर्गत किसान रेल्वेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता. याला महाराष्ट्रातील डाळिंब, केळी, संत्रा, पेरू, सिमला मिरची, खरबूज, कलिंगड, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत असल्याने किसान रेल्वे प्रचंड लोकप्रिय झाली आहे.कमी वेळेत जास्त अंतर पार करण्यासाठी सुरक्षित स्थळी शेतमाल पोहोचवणाऱ्या किसान रेल्वेला शेतकऱ्याकडून जास्तीत जास्त प्रतिसाद मिळत आहे. ऑपरेशन ग्रीन अंतर्गत किसान रेल्वेच्या भाड्यात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय 31 मार्च 2022 पर्यंत वाढवला आहे. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ऑपरेशन ग्रीन्स –टॉप टू टोटल अंतर्गत शेतकऱ्यांना किसान रेल्वेच्या भाडेदरात 50 टक्के सवलत देण्यासाठी 2020-21 च्या अर्थसंकल्पात 50 कोटी रुपयांची तरतूद केली होती. ही सवलत 31 मार्च 2022 पर्यंत पुढे कायम ठेवली असून अर्थसंकल्पात आणखी 50 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.किसान रेल्वे वाहतुकीसाठी 50 टक्के सवलत देण्याची मुदत 31 मार्च 2021 पर्यंत होती. किसान रेल्वेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद असल्याने आणखी काही वर्षे भाडे दरात सवलत देण्याची मागणी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल, सोलापूर रेल्वे मंडळ समितीचे अध्यक्ष खा.रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडे केली होती. या मागणीची तातडीने दखल घेऊन किसान रेल्वेच्या भाडेदरात 31 मार्च 2022 पर्यंत सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चेतनसिंह केदार-सावंत, भाजप तालुकाध्यक्ष,सांगोला


Post a Comment

0 Comments