हातीदमधील शेकडो कार्यकर्त्यांचा चेतनसिंह केदार-सावंत यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश
सांगोला (तालुका प्रतिनिधी): हातीद ता.सांगोला येथील शेकडो कार्यकर्त्यांनी दत्ताजीराव केदार यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. सांगोला तालुक्यातील प्रत्येक घराघरात भाजपचे विचार पोहोचवणार असल्याचे प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष म्हणून चेतनसिंह केदार सावंत यांनी पदभार घेतल्यानंतर सांगोला तालुक्यात भाजपची ताकद वाढली आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत चेतनसिंह केदार सावंत यांनी वासूद ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकवला आहे. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपच्या सक्रिय कार्यकर्त्यांना निवडून आणण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे तालुक्यात भाजपची जोमाने वाटचाल सुरू आहे.
भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष म्हणून चेतनसिंह केदार सावंत यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी हातीद ता.सांगोला येथील राहुल महादेव मंडले, हणमंत उद्धव घाडगे, रमाकांत अण्णा गुरव, गणेश श्रीरंग सुतार, प्रमोद बाळासाहेब घाडगे, समाधान मधुकर भडंगे, सतीश अंकुश चव्हाण, गणेश नामदेव मंडले, संतोष श्रीरंग सुतार, संजय केदार या कार्यकर्त्यांनी दत्ताजीराव केदार यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी वासूदचे उपसरपंच अनिल (बंडू) केदार, प्रवीण मोहिते, दीपक केदार आदी उपस्थित होते. यावेळी चेतनसिंह केदार सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नूतन कार्यकर्त्यांचा फेटा बांधून पक्षात स्वागत केले.
0 Comments