सांगोला : तू आमच्या विरोधात दिलेली तक्रार माघार घे असे म्हणून संतापलेल्या झेडपीच्या पशुसंवर्धन सभापतींसह तिघांनी एक्सयुव्ही गाडी इर्टिगा कारला आडवी लावून हातातील तलवार , कुहाड , गजाने इर्टीगा गाडीच्या समोरील काचेवर , बॉनेटवर , मागील काच , साईड लॅम्प फोडूनसुमारे २ लाख रुपयांचे नुकसान केले .
तर त्यांच्या भावकीतील १३ जणांनी मिळून चौघांना शिवीगाळ दमदाटी करीत गजाने व हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली . ही घटना २६ मार्च रोजी रात्री १०:३० च्या सुमारास घेरडी ( ता . सांगोला ) येथील अहिल्या चौकात घडली . भारत मोटे , गुलाब मोटे , सचिन केसकर , आवासो पुकळे ( रा . घेरडी ) अशीजखमींची नावे आहेत . याबाबत भारत मोटे , गुलाब मोटे , सचिन केसकर , आबासो पुकळे हे गुलाब मोटे यांना शिवीगाळी केल्याबाबत सांगोला पोलीस स्टेशनला तक्रार देऊन २६ मार्च रोजी रात्री १०:३० च्या सुमारास घरी होते . त्यावेळी गावातील अहिल्या चौकात भारत मोटे यांच्या एमएच ०१ / सीएक्स २२७१ या कारला भावकीतील व जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन सभापती अनिल मोटे यांनी त्यांची एमएच ४५/८६०१ ही एक्सयुव्ही ही गाडी रस्त्यात आडवी लावून भारत मोटे यांची गाडी थांबवली . गाडीतून उतरून तू आमच्या विरोधात दिलेली तक्रार मागे घे असे म्हणून हातातील | तलवारीनेकारवर मारण्यास सुरू केले . यावेळी त्यांच्या समवेत आलेल्या विलास माने व सुरेश बुरुंगले यांनी कुहाड , गज , तलवारीने कारची समोरील काच , बॉनेट , पाठीमागील काच , साईट लाम्प फोडले . हा प्रकार चालू असताना अनिल मोटे यांनी गजाने भारत मोटे यांच्या उजव्या दंडावर , गालावर , डाव्या मारहाण केली . तर गुलाब मोटे यांनाही गजाने डाव्या हातावर मनगटाजवळ , डाव्या पायाजवळ मारहाण केली . सुरेश बुरुंगले यांनी सचिन केसकर यांना गजाने मारहाण केली . तर विलास माने आणि आबासो पुकळे यास त्याच गजाने मारहाण केली . यावेळी भावकीतील अंकुश मोटे , तानाजी उर्फ बंड मोटे , प्रकाश मोटे , संजय पोळ , समाधान मोटे , दगडू पुकळे , जालू मोटे , तानाजी आलदर , अण्णासो उर्फ विजय | मोटे , दिलीप मोटे , अनिल काकेकर , महेश खताळ , सचिन मोटे यांनी | दुचाकीवरून भांडण व मारहाण करण्यासाठी गैरकायद्याची मंडळी जमवूनचौघांना हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली.याबाबत भारत बिरा मोटे यांनी फिर्याद दाखल केली आहे .
0 Comments