google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील सीएचबी प्राध्यापकांचे भवितव्य अधांतरी ; वर्षभरापासून कामच नाही

Breaking News

सांगोला तालुक्यातील सीएचबी प्राध्यापकांचे भवितव्य अधांतरी ; वर्षभरापासून कामच नाही

 सांगोला ( प्रतिनिधी ) : कोरोनामुळे महाविद्यालये मार्च २०२० ला बंद झाली . तेव्हापासून महाविद्यालयातील तासिका साखाकील प्राध्यापकांचा रोजगार बंद झाला.त्यामुळे वर्षभरापासून ना प्राध्यापकांचा मान मिळाला ना अपेक्षित धन मिळाले त्यामुळे सीएचवी प्राध्यापकांचे भवितव्य अधांतरी असून गेल्या वर्षभरापासून सीएचबी प्राध्यापकांकडे शासनाकडून आणि संस्थाकडूनही दुर्लक्ष केले आहे


. महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत . अशावेळी अध्यापनाचे काम सुरू ठेवण्यासाठी संस्थानी तासिका तत्वावरील प्राध्यापकांची नेमणूक केली . जेवढे तास ते शिकवतील तेवढी रक्कम त्यांना दिली जायची . पण संस्था या प्राध्यापकांना अ य । प न । बराबरच महाविद्यालयातील विविध उपक्रमांचे नियोजन , कार्यक्रमाची तयारी , परीक्षा घेणे , अशी कामेही करुन घेऊ लागल्या . त्यानंतर शासनाने तासिका तत्वावरील नियुक्तीबाबत नियम केले . या प्राध्यापकाची निवड मुलाखत घेऊन केली जाऊ लागली . त्यांचेया मानधन दरमहिन्याला दिले पाहिजे असे ठरवले . सर्व नियमांची अंमलबजावणी सुरू झाली पण तेवढ्यात कोरोनाचे सावट आले . त्यामुळे मार्चमध्ये महाविद्यालये बंद झाली . गेले दहा महिने या प्राध्यापकाना अपेक्षित मानधन मिळाले नाही . शासनाने यांच्याकडे दुर्लक्षच केले . त्याची नियुक्ती , मानधन याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही . आता १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू होणार आहेत . आता प्रशासनाला या तासिका तासिका तत्वावरील प्राध्यापकांची आठवण होईल . मात्र वर्षभर या प्राध्यापकांनी जे भोगलेत्याची कोणताही खंत प्रशासनाला नाही.तासिकातत्वावरील सर्व प्राध्यापक उच्चशिक्षीत आहेत . बहुतेकानी पी.एच.डी संपादित केली आहे मात्र भविष्यातील अनिश्चितता पासून त्यांनी आपले क्षेत्रच बादलले आहे . कोणी व्यवसाय सुरू केले आहेत तर कोणी अन्य ठिकाणी नोकरी करत आहेत . शासनाचे धोरण नसल्याने हे कुशल मनुष्यबळ वाया जात आहे . तासिका तत्वावरील शिक्षकाबाबत शासनाकडून अद्याप कोणताही निर्णय आलेला नाही . महाविद्यालये सुरू होण्याआधी याचा धोरण शासनाकडून जाहीर होण्याची शक्यता आहे .

Post a Comment

0 Comments