मूत्ररोग व किडनी विकारांवर आता मोफत उपचार!
खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला येथील कडलास रोडवरील सांगोला महाविद्यालयात शेजारी खंडागळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये आता मूत्ररोग,
किडनीचे आजार आणि संबंधित शस्त्रक्रियांचे मोफत निदान व उपचार उपलब्ध झाले आहेत. अशी माहिती खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्वे सर्व डॉक्टर परेश खंडागळे यांनी दिली
शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना अंतर्गत हे उपचार पूर्णतः मोफत दिले जाणार आहेत.
हॉस्पिटलमध्ये पुढील रोगांवर उपचार केले जातात मूत्ररोग,
प्रोस्टेट ग्रंथीची सूज,मूतखडा ,किडनी व मूत्रपिंडाचे आजार,किडनीतील खडे,
मूत्रमार्गातील खडे, या सर्व प्रकारच्या रुग्णांवर उपचार व निदान केले जाणार आहे यामध्ये पात्र लाभार्थ्यांसाठी आवश्यक कागदपत्रे: पांढरा, केशरी किंवा पिवळा रेशनकार्ड,
आधारकार्ड, बँक पासबुक आणि जन्माचा दाखला. घेताना सोबत आणावी अशी आव्हान खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर परेश खंडागळे यांनी केले आहे
0 Comments