ब्रेकिंग न्यूज...पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या विद्यार्थ्यांना कॅरी ऑन द्यावे – खा.धैर्यशिल मोहिते-पाटील
अकलूज : अनेक महाविद्यालयामध्ये विद्यार्थी नापास झालेले असून त्यांना एनईपीमुळे पुढच्या वर्षी कुठेही प्रवेश घेता येणार नाही अशी परिस्थिती आहे.
अशा नापास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून यांना गतवर्षी प्रमाणे पुढील वर्गात एका सत्रासाठी प्रवेश देणे अत्यंत आवश्यक आहे
याबाबत खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू यांना पत्र लिहून मागणी केली.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये NEP २०२० लागू करण्यात येत असल्याने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये
अनुत्तीर्ण झालेल्या पदवी प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना २०२४-२५ मध्ये पुढील वर्गातप्रवेश देण्यास carry-on मिळणे आवश्यक आहे.
यु. जी. सी., नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार आपल्या विद्यापीठाने N+ २ ची अंमलबजावणी सुरु केली आहे.
N + २ नियमावलीच्या अंमलबजावणीमुळे पदवी पूर्ण करण्याचा कालावधी सिमीत करण्यात आला आहे.तसेच अद्याप काही विद्यार्थ्यांचे निकाल RR, photocopy, rechecking इ. मुळे प्रलंबित आहेत.
त्यामुळे वरील सर्व विद्यार्थ्यांना संबंधित पदवी शिक्षण विहित कालावधीमध्ये पूर्ण करण्यासाठी carry-on मिळावा
अशी मागणी विध्यार्थी व पालकांकडून केली जात आहे. तरी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये अनुत्तीर्ण झालेल्या पदवी प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षातील
विद्यार्थ्यांना २०२४-२५ मध्ये पुढील वर्गाच्या प्रवेशासाठी carry-on मिळणेसाठी आपल्याकडून आवश्यक कार्यवाही व्हावी म्हणून खासदार धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी कुलगुरू यांच्या कडे मागणी केली
0 Comments