खळबळजनक..सोलापूर! दहा हजार रुपये आत्ताच दे म्हणत डोक्यात घातली फरशी
सोलापूर (प्रतिनिधी) माझे राहिलेले दहा हजार रुपये आत्ताच्या आत्ता दे असे म्हणत शिवीगाळ करून कमरेच्या बेल्टने मारहाण करत फरशी डोक्यात घालून दुखापत
केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ११ मार्च रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हॉटेल खान चाचा जवळ घडली.
याप्रकरणी राम ज्ञानेश्वर हक्के (वय-३२,रा.कुमार स्वामी,मित्र नगर, शेळगी) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून लक्ष्मण मोरे,अभि व अनिकेत पूर्ण नाव माहित नाही
(रा.कण्णी प्लॉट,दहिटणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे विजय रुपनर धनंजय रुपनर यल्लाप्पा पांढरे असे मिळून वरील ठिकाणी थांबलेले असताना
वरील संशयित आरोपी हे फिर्यादी जवळ येऊन लक्ष्मण मोरे याने माझे राहिलेले दहा हजार रुपये आत्ताच्या आत्ता दे असे म्हणाला. त्यावेळी फिर्यादी यांनी थोड्या वेळाने माझ्या मालकाकडून पैसे घेऊन देतो असे म्हणत
असताना फिर्यादी यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली व तसेच अभि आणि अनिकेत यांनी कमरेचे पट्टे काढून फिर्यादी यांच्या अंगावर मारहाण केली.
दरम्यान लक्ष्मण मोरे याने तेथेच पडलेली फरशी घेऊन फिर्यादी यांच्या डोक्यात मारून दुखापत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पवार हे करीत आहेत.
0 Comments