कोळे ता.सांगोला येथे आजी-माझी सैनिक बांधवांचे वाढदिवस तसेच वीरमाता वीर पत्नी यांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन...
कोळे प्रतिनिधी / (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सालाबाद प्रमाणे याही वर्षी शिव हिंदुस्थान मित्र मंडळ व कोळे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने वीर जवान तुझे
सलाम देशासाठी अहोरात्र लढणाऱ्या सैनिकांना मनाचा मुजरा. दि.३०.०१.२०२४ रोजी वीरमाता वीर पत्नी यांचा सन्मान सोहळा व
आजी - माझी भारतीय सैनिकांचा अभूतपूर्व असा वाढदिवस कोळे नगरीत होणार आहे.सदर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे अँ. कॅप्टन रावसाहेब साळुंखे
(माझी सैनिक संघटना अध्यक्ष सांगोला), अँ. कॅप्टन दिलीप जाधव (माझी सैनिक संघटना अध्यक्ष क. महांकाळ) या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती आ.श्री.शहाजी (बापू) पाटील शिवसेना आमदार शिंदे गट,
रा.काँगेस पार्टी जिल्हाध्यक्ष श्री.दिपक (आबा) साळुंखे - पाटील, पु.युवक संघटना प्रदेशाध्यक्ष शेकाप श्री.बाबासाहेब देशमुख,
अनिकेत देशमुख शेकाप युवक नेते, चेतनसिंह केदार-सावंत भाजपा सोलापूर जिल्हाध्यक्ष,प्राध्यापक पी.सी.झपके सर,
लक्ष्मण हाके शिवसेना प्रवक्ते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.तरी ह्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिव हिंदुस्थान मित्र मंडळ कोळे यांचेकडून करणेत आले आहे.
0 Comments