मुक बधिर निवासी शाळा सांगोला येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा....
कोळे/ वार्ताहर (शब्दरेखा एक्सप्रेस न्युज नेटवर्क सांगोला )
जन जागरण प्रबोधन मंच चोपडी :
मुक बधिर निवासी शाळा सांगोला येथे शिक्षक दिन मा. चेतनसिंह केदार यांच्या हस्ते साजरा करण्यात आला. आज दि. ०५ सप्टेंबर, २०२३ रोजी भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा ग्रामीण जिल्हाअध्यक्ष मा. श्री. चेतनसिंह केदार यांचे स्वागत मुक बधिर शाळेतील मुलींनी औक्षण करुन केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीस मा. चेतनसिंह केदार यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन केले. त्यानंतर संस्थेच्या व शाळेतच्या वतीने मा. चेतनसिंह केदार यांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.
सदर कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका शैलजा पाटील मॅडम, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, कार्यकर्ते, विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments