वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात सुदृढ बालक आरोग्य तपासणी.

सांगोला (प्रतिनिधी)वामनराव शिंदेसाहेब आदर्श विद्यालयात जागरूक पालक सदृढ बालक 2023 मोहीमेअंतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

सांगोला ग्रामीण रुग्णालय यांच्यावतीने वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही एन बाड, डॉ. एस व्ही फाटे यांच्या टीमने प्रशालेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली,

 यामध्ये किरकोळ आजारी असलेले ,विद्यार्थी गंभीर आजारी विद्यार्थी इयत्ता पाचवी ते दहावी मधील सर्व विद्यार्थ्यांचे तपासणी करून समुपदेशन करण्यात आले व विद्यार्थ्यांना औषध ,गोळ्या देऊन उपाय करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रमेश पवार सर यांनी केले. आरोग्य तपासणी यशस्वीतेसाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.