सोलापूर- लग्नाला झाले होते फक्त चार महिने, चुलीवरचा स्वयंपाक येत नाही विवाहितेचा गळा दाबून खून
श्रीपूर : नेवरे, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर येथील घटना. पोलिसांकडील दाखल माहिती नुसार माळशिरस तालुका नेवरे येथील गणेश पांडुरंग गायकवाड याच्याशी करमाळा येथील कोमल सुभाष यादव हिचा चार महिन्यापूर्वी 20 ऑगस्ट 2022 रोजी विवाह झाला होता. लग्नानंतर कोमलला सासू मनीषा व सासरा पांडुरंग गायकवाड आणि नवरा गणेश हे तिघे मिळून मानसिक त्रास देत होते.
तिचा नवरा कोमलच्या माहेरच्या लोकांना फोन देखील करू देत नव्हता. माहेरून पंधरा हजार रुपये घेऊन ये, म्हणून 18 डिसेंबर रोजी कोमलला सासरच्या लोकांनी बेदम मारहाण करून, तिच्या बांगड्या फोडून, नरडे दाबून तिचा खून केला. खून प्रकरण उजेडात येऊ नये म्हणून, तिने फास घेतला असा बनावट कांगावा केला.
असे आरोपीच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी कोमलच्या माहेरी कडील यादव कुटुंबांना संपर्क साधून. तुमची मुलगी सिरीयस आहे. घेऊन जावा. असा निरोप दिला. माहेरचे लोक अकलूज येथे दवाखान्यात गेले असता, तिचा मृत्यू झाला असून, तिचे शवविच्छेदन सुरू असल्याचे सांगण्यात आले.
गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही. अशी भूमिका कोमलच्या आई-वडील आणि नातलगांची होती. अकलूज पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर, तिच्या माहेरी करमाळा येथे तिच्यावरती अंत्यसंस्कार केल्याचे कोमलच्या आई कडून सांगण्यात आले.
कोमल आणि गणेश चा विवाह होऊन नुकतेच चार महिने झाले होते. कोमल गणेश गायकवाड असे विवाहित मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणाबाबत कोमलची आई राणी सुभाष यादव यांनी अकलूज पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिलेली आहे.
या गुन्ह्याबाबत अकलूज पोलिस ठाण्यात नवरा गणेश पांडुरंग गायकवाड, सासू मनीषा गायकवाड, सासरा पांडुरंग गायकवाड यांच्यावर खून करणे, मानसिक व शारीरिक त्रास देणे, पुरावा नष्ट करणे, या कलमांतर्गत 302, 304, 34 बी, प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत. तीनही आरोपींना अकलूज पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास अकलूज पोलिस स्टेशनच्या पीएसआय स्वाती कांबळे मॅडम करीत आहेत.
0 Comments