एक्झिट पोलवर बंदी येणार ; निवडणूक आयोग ‘अॅक्शन मोड’वर
एकावेळी दोन-दोन जागांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निवडणूक आयोग धक्का देण्याच्या तयारी असून येत्या काळात एक उमेदवार एकच जागा लढवू शकतो. त्या उमेदवाराला दुसऱ्या जागी निवडणूक लढवू देण्यास मुभा देऊ नये. एक्झिट पोल्ससह जनमत चाचण्यांवर बंदी आणवी, अशी भूमिका निवडणूक आयोगाने घेतली आहे.
त्या संबंधी मागमी करणारा प्रस्ताव मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केंद्र सरकारकडे पाठवला आहे. अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात एकापेक्षा जास्त जागेवरुन निवडणूक लढवत असल्याचे पाहण्यात आले आहे.
मुख्य निवडणूक आयोगाने याला विरोध केल्याचे प्रस्तावातून दिसत आहे. एक्झिट पोल्सची चर्चा निवडणूक निकालाची आधी असायची. या पोल्सवरही बंद येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आयोगाने केल्या या मागण्या – नव्या मतदारांची नोंदणी करण्यासाठी चार कटऑफ तारखंचा नियम जारी करावा. एका उमेदराला एकापेक्षा जास्त जागेवरुन निवडणूक लढवू देऊ नये, त्यासाठी लोकप्रतिनिधी कायदा 1951च्या कलम 33(7) मध्ये दुरुस्तीस मंजुरी द्यावी.
राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला द्यावेत. एक्झिट पोल्स आणि जनमत चाचण्यांवर बंदी असावी.


0 Comments